भारुडातून केली कोरोनाविषयी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:09 AM2021-09-13T04:09:57+5:302021-09-13T04:09:57+5:30

डोंगरी भागातील बसरापूर आनंदवाडी येथे चंद्रकांत झांजले व त्यांची मुलगी भक्ती झांजले यांनी भारुडी भाजनातून एकनाथ महाराज जीवनाच्या ...

Awareness about Kelly Corona from Bharuda | भारुडातून केली कोरोनाविषयी जनजागृती

भारुडातून केली कोरोनाविषयी जनजागृती

Next

डोंगरी भागातील बसरापूर आनंदवाडी येथे चंद्रकांत झांजले व त्यांची मुलगी भक्ती झांजले यांनी भारुडी भाजनातून एकनाथ महाराज जीवनाच्या अवस्था व कोरोना (तिसरी लाट)विषयी समाजप्रबोधन केले.

यावेळी हार्मोनियमवादक शांताराम पवार, भीमराव झांजले, पखवाजवादक अनिकेत झांजले, सौरभ झांजले, दत्तात्रय पवार, मोहन पवार, विष्णू झांजले, तानाजी झांजले, राजाराम झांजले, गजानन झांजले, कांता झांजले, रमेश बा. झांजले, शांताराम झांजले, प्रदीप झांजले, प्रवीण झांजले, सीताराम पवार आदींसह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

शासनाने यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यास सांगितले आहे. तसेच या काळात जनजागृती, समाजप्रबोधन कार्यक्रम करण्यासाठी नियमांचे पालन करून परवानगी दिली आहे. कोरोना आजाराने गेली दोन वर्षे झाली थैमान घातले असताना लोक अजूनही ऐकत नाही. समाजाला जागृत करण्यासाठी भरुडातून, भजनाच्या माध्यमातून कला सादर करीत कोरोनाविषयी जनजागृती, उपाययोजना, संरक्षण, खबरदारी, कुटुंबाची काळजी कशी घेणे अशा सर्व विषयांवर समाजप्रबोधन भजनातून चंद्रकांत झांजले यांनी केले. आनंदवाडी ग्रामस्थांकडून या भारुडाचे विशेष कौतुक करण्यात आले.

भारुडातून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी जनजागृती करताना भक्ती झांजले.

Web Title: Awareness about Kelly Corona from Bharuda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.