ठाकरवस्तीमध्ये जनजागृती अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:09 AM2021-06-17T04:09:22+5:302021-06-17T04:09:22+5:30
आंबेगाव तालुक्यातील आदिवासी ठाकरवस्ती येथे कोविड लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने लसीकरणाविषयी जाणीवजागृती करणेसाठी आदीम संस्थेच्या वतीने जाणीवजागृती ...
आंबेगाव तालुक्यातील आदिवासी ठाकरवस्ती येथे कोविड लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने लसीकरणाविषयी जाणीवजागृती करणेसाठी आदीम संस्थेच्या वतीने जाणीवजागृती अभियान दि. ८ ते १४ जून दरम्यान आयोजित करण्यात आले होते. या जाणीवजागृती अभियानात कर्वे समाज सेवा संस्थेच्या व सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहभागी विद्यार्थ्यांनी २५ पेक्षा अधिक ठाकरवस्तींमध्ये घरोघरी जाऊन लसीकरणाचे महत्व समजावून सांगितले व लसीकरणाची माहिती देणारी पुस्तिका वाटप केली. या जाणीवजागृती अभियानाच्या समारोप प्रसंगी जेष्ठ समाजसेविका साधना दधिच यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे कक्ष अधिकारी योगेश खंदारे, आदीम संस्थेचे डॉ. हनुमंत भवारी, डॉ. अमोल वाघमारे, किरण लोहकरे, रामकृष्ण बोऱ्हाडे, राजू घोडे उपस्थित होते. या अभियानात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा बांबळे, प्रास्ताविक युवराज काळे तर आभार स्नेहल साबळे यांनी मानले.
--
१६भीमाशंकर ठाकरवस्ती कार्यक्रम
ठाकरवस्ती : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी ठाकरवस्ती मध्ये राबविलेल्या जाणीवजागृती अभियानात सहभागी विद्यार्थ्यांसमवेत साधना दधीच..