कोरोना प्रतिबंधासाठी आयुर्वेदाचे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:09 AM2021-05-23T04:09:19+5:302021-05-23T04:09:19+5:30

डॉ. प्रेरणा बर्वे आयुर्वेद व योग तज्ज्ञ ----------------- साधारण दीड वर्षापासून कोरोना ह्या महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. कोरोनाची ...

Ayurvedic remedies for corona prevention | कोरोना प्रतिबंधासाठी आयुर्वेदाचे उपाय

कोरोना प्रतिबंधासाठी आयुर्वेदाचे उपाय

Next

डॉ. प्रेरणा बर्वे

आयुर्वेद व योग तज्ज्ञ

-----------------

साधारण दीड वर्षापासून कोरोना ह्या महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. कोरोनाची घोडदौड सुरूच आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे, भीतीचे वातावरण आहे. त्याउलट काहीजण मला काही होणार नाही, ह्या भ्रमात आहेत. त्यांना कोरोना होईल तेव्हाच त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटणार आहे.

___ कोरोना विरुद्धची लढाई सोपी नक्कीच नाही त्यासाठी मास्क लावणे, हात धुणे व सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब तर केलाच पाहिजे व कोरोनाचा प्रतिबंध केला पाहिजे. पण, हा प्रतिबंध करायचा कसा? तर... व्याधिक्षमत्वरुपी ढाल आपल्याला ह्या लढाईत कामी येणार आहे. पण, व्याधिक्षमत्व काही जादूची कांडी फिरवल्याने मिळणार नाही. त्यासाठी ईच्छाशक्ती, संयम व सातत्य हवे असते. अशावेळी शाश्वत आयुर्वेद शास्त्र मदतीला येते. आपण म्हणतो Prevention is better than cure. हाच आयुर्वेदाचा मूळ सिद्धांत आहे.

स्वास्थस्य स्वास्थ रक्षणम |

आतुरस्य विकार प्रशमन च ॥

अर्थ- स्वस्थ लोकांच्या आरोग्याचे रक्षण करायचे व जे रोगी आहेत त्यांना निरोगी बनवायचे. आयुर्वेद शास्त्रावर विश्वास ठेवून जर सर्वांनी आचरण केले तर कोरोना सारखे विषाणू संक्रमण करणार नाहीत, केले तरी आपल्यावर त्याचा परिणाम होणार नाही व झालेच तर थोड्या प्रमाणात होईल. कोरोना प्रतिबंधसाठी काही उपाय बघूया -

१) लवंग, धणे, सुंठ, आले, जिरे, ओवा इ. घटक पाण्यात चहासारखे उकळून घोट घोट प्यावे.

२) तुळशीचा काढा- चार कप पाण्यात दहा ते पंधरा तुळशीची पाने व थोडा गूळ घालून एक कप उरेपर्यंत उकळून हे मिश्रण थर्मास मध्ये भरून ठेवावे व दोन ते चार चमचे येता-जाता सेवन करावे.

३) हळद टाकून दुध प्यावे. ४) नियमित च्यवनप्राश सेवन करावे.

५) नस्य - नाकामध्ये तीळतेल, तूप याने प्रतीमर्ष नस्य करावे.

६) गंडूष- तोंडामध्ये एक चमचा तीळतेल किवा खोबरेल तेल घेऊन , २ - ३ मिनीट ठेवून नंतर थुंकून द्यावे. असे दिवसातून एक दोन वेळा करावे.

७) जेवण बनवताना हळद, जिरे, दालचिनी, धने, लसूण, तमालपत्र इ. मसाल्याचा प्रयोग करावा.

८) अन्न हे पूर्णब्रह्म आहे म्हणून सात्विक आहार घ्यावा.

९) AYUSH मंत्रालयाने सूचित केलेल्या आयुषकाढा मध्ये तुळस, काळी मिरे, दालचिनी, सुंठ व मनुका हे घटक आहेत. त्याचे प्राशन करावे. त्यातील घटक द्रव्यांचे आयुर्वेदिक गुणधर्म खालील प्रमाणे आहेत -

अ) तुळस - पार्श्वस्क कफवातजित |

(भावप्रकाश)

तुळशिमुळे कफ व वात कमी होतो, ताप कमी होतो व श्वसन संस्थेला लाभ होतो.

ब) मिरे - सर्वकासहरम श्रेष्ठं

लेहयं कासार्दीतो नर; |

(चरक)

मिरे सगळ्या प्रकारच्या काससाठी श्रेष्ठ व ज्वरघ्न आहे. क) दालचिनी- कृमिपीनसकासजित |

(भावप्रकाश)

दालचिनी सर्दी व खोकल्यावर गुणकारी आहे.

ड) सुंठ - जिव्हा कंठ विशोधनम | __सुंठीमुळे जीभ व गळ्याच्या भागाची शुद्धी होते तसेच अग्निप्रदीपन होते.

इ) काळा मनुका - रक्तपितज्वरश्वास |

तृष्णादाहक्षयापहा ॥

काळा मनुकामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते, ज्वर कमी होतो. आपल्याला माहीत आहे की शरीर कमजोर तर जंतू शिरजोर. त्यासाठी उपरोक्त आयुर्वेदिक प्रतिबंध उपायांचा अवलंब केला तर आपली प्रतिकारशक्ती वाढून आपण सर्दी, खोकला, कोरोना सारख्या विषाणूजन्य आजारांपासून स्वतःचे व आपल्या निकटवर्तीयांचे संरक्षण करू शकतो.

Web Title: Ayurvedic remedies for corona prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.