केंद्र सरकारच्या धर्तीवर आयुष मंत्रालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करू- हसन मुश्रीफ

By ज्ञानेश्वर भोंडे | Published: August 16, 2023 04:21 PM2023-08-16T16:21:43+5:302023-08-16T17:05:49+5:30

आयुर्वेद टीचर्स असोसिएशन तर्फे जीवनगौरव पुरस्कार प्रदान...

AYUSH Ministry on the lines of the Central Government Medical Education Minister Hasan Mushrif | केंद्र सरकारच्या धर्तीवर आयुष मंत्रालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करू- हसन मुश्रीफ

केंद्र सरकारच्या धर्तीवर आयुष मंत्रालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करू- हसन मुश्रीफ

googlenewsNext

पुणे : आयुर्वेद आणि ॲलोपॅथी यांसारख्या विविध वैद्यकीय शाखांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

आयुर्वेद टीचर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान नाशिक यांच्यातर्फे शिवदर्शन येथील राजीव गांधी ई लर्निंग स्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बाेलत हाेते. या कार्यक्रमाला शिक्षक आमदार जयंत आसगावकर, संघटनेचे अध्यक्ष डॉ. राहुल सूर्यवंशी, उपाध्यक्ष डॉ. नितीन चांदुरकर, बडोदा पारुल विद्यापीठाचे आयुर्वेद विभाग अधिष्ठाता डॉ. हेमंत तोशीखाने, डॉ आनंद मादगुंडी डॉ. नितीन वाघमारे, डॉ. संदीप जाधव, डॉ क्षितिजा शिंदे, डॉ सचिन चंडालिया, डॉ. प्रदीप कुमार जोंधळे, डॉ दत्तात्रय लोधे, डॉ अरुण दुधमल आदी यावेळी उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले, राज्यामध्ये असणाऱ्या सहा शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि १६ अनुदानित महाविद्यालयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापकांची पदे रिक्त होती. शासकीय महाविद्यालयांमधील ९० टक्के पदे एमपीएससी च्या माध्यमातूनही भरण्यात आली आहेत. आयुर्वेद शिक्षकांसाठी सातवा वेतन आयोग लागू करावा, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आसगावकर म्हणाले, पूर्णतः आयुर्वेदाला वाहून घेणारी तरुण पिढी निर्माण केली पाहिजे. हेमंत तोशीखाने यांनी आयुर्वेद शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले. आयुर्वेद क्षेत्रातील भरीव योगदानासाठी डॉ. गोविंद उपाध्याय आणि डॉ. भालचंद्र भागवत यांना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Web Title: AYUSH Ministry on the lines of the Central Government Medical Education Minister Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.