आयुष प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:16 AM2021-09-15T04:16:11+5:302021-09-15T04:16:11+5:30

आयुष प्रसाद हे मूळचे झारखंड राज्यातील रांची येथील आहेत. त्यांचे शालेय शिक्षण कर्नाटक राज्यात झाले. यानंतर त्यांनी दिल्ली येथे ...

Ayush Prasad | आयुष प्रसाद

आयुष प्रसाद

Next

आयुष प्रसाद हे मूळचे झारखंड राज्यातील रांची येथील आहेत. त्यांचे शालेय शिक्षण कर्नाटक राज्यात झाले. यानंतर त्यांनी दिल्ली येथे उच्च शिक्षण घेतले. त्यांचे ग्रॅज्युऐशन बी.ई.मॅकेनिकल शाखेत झाले. यानंतर त्यांनी काही काळ पत्रकारिताही केली. विशेष म्हणजे त्यांचे आई आणि वडील हे भारतीय प्रशासकीय सेवेतील आहे. त्यांचे वडील कर्नाटकचे डीजीपी होते. ते नुकतेच निवृत्त झाले, तर आईसुद्धा आयएएस अधिकारी असून त्या कर्नाटकच्या अप्पर सचिव आहेत. त्यांच्या या यशात त्यांच्या आई-वडिलांचा मोलाचा वाटा असल्याचे ते सांगतात.

--

पूर्वपरीक्षा

संपूर्ण परीक्षेची अभ्यासक्रमाची यादी बनवत तो आधी पूर्णपणे समजून घ्यावा. अभ्यासक्रम पूर्ण संपवावा. दोन विषयांमधील संबंध समजून घ्यावे. कुठल्याही विषयाचे संपूर्ण ज्ञान असायला हवे. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आत्मविश्वास आणि प्रसंगावधान महत्त्वाचे आहे. पूर्वपरीक्षेत येणारे बहुपर्यायी प्रश्न हे गोंधळात टाकणारे असतात. यामुळे योग्य पर्याय निवडणे हे महत्त्वाचे असते. गोंधळ होऊ न देता योग्य पर्याय निवडण्यासाठी योग्य प्रकारचा सराव हा पूर्वपरीक्षेसाठी महत्त्वाचा असतो.

---

मुख्य परीक्षा

मुख्य परीक्षेसाठी उत्तरे लिहिण्याचा सराव महत्त्वाचा आहे. तुमची उत्तरे हे ‘टू द पॉईंट’असणे गरजेचे आहेत. त्या सोबतच विश्लेषणात्मक आणि सर्व प्रकारच्या बाजू मांडणारे हवेत. तुम्ही लिहिलेली उत्तरे ही व्यवस्थित आणि पद्धतशीर असायला हवी.

---

निबंध

तुमचा निबंध वेगळा कसा असेल यावर भर द्या. निबंधाच्या विषयाची पूर्ण माहिती असायला हवी. निबंधाचा गोषवारा, विषय परिचय, मजकूर आणि निष्कर्ष हा स्पष्ट असावा. निबंध लिहिण्याचा सराव वारंवार करा. यासाठी पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावा.

----

मुलाखत

मुलाखत देताना स्पष्ट आणि थेट बोलावे. बोलताना आपल्यातील आत्मविश्वास हा मुलाखत घेणाऱ्यांना दिसावा. यासाठी रोज तुम्हाला सराव करावा लागेल. मुलाखत कोणत्याही भाषेत देता येते. यामुळे भाषा येत नसल्याची भीती बाळगू नका. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा व्यवस्थित अभ्यास असावा.

- निनाद देशमुख.

Web Title: Ayush Prasad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.