आळे महाविद्यालयास बी प्लस श्रेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:13 AM2021-08-19T04:13:17+5:302021-08-19T04:13:17+5:30
बेरहमपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बिजयकुमार साहू, हैदराबाद येथील इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेज विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. थारकेश्वर व्ही.बी तामिळनाडू ...
बेरहमपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बिजयकुमार साहू, हैदराबाद येथील इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेज विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. थारकेश्वर व्ही.बी तामिळनाडू येथील मरूधर केसरी जैन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सेंथिलराज यांचे समितीने महाविद्यालयास भेट देत २०१४ -१५ ते २०२०-२१ या शैक्षणिक कालावधीत महाविद्यालयाचे वेगवेगळ्या निकषांवर परीक्षण केले. यामध्ये महाविद्यालयात शिकवले जाणारे अभ्यासक्रम उपक्रम, ग्रंथालय, विद्यार्थ्यांना खेळासाठी उपलब्ध सुविधा क्रीडांगण, भौतिक सुविधा , ग्रंथालय, परीक्षा पद्धती, संस्थेचे पदाधिकारी आजी- माजी विद्यार्थी, पालक यांच्याबरोबर चर्चा करत विद्यार्थी शिष्यवृत्ती आदी बाबींवर परीक्षण केले होते.
नॅकची बी प्लस ग्रेड मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष भाऊशेठ कुऱ्हाडे, उपाध्यक्ष उल्हास सहाणे, सचिव बाळासाहेब गुंजाळ, खजिनदर रोहिदास पाडेकर, संचालक किशोर कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, प्रसन्न डोके, जी. एल. गुंजाळ, बबन सहाणे, अर्जुन पाडेकर, शिवाजी सहाणे, अरूण हुलवळे, राजेंद्र कुऱ्हाडे यांनी प्रभारी प्राचार्य डाॅ. प्रवीण जाधव, समन्वयक डाॅ. अरुण गुळवे यांचेसह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.
180821\img-20210818-wa0043.jpg
आळे महाविद्यालयास नॅकची बी प्लस ग्रेड मिळाल्याबद्दल शिक्षकवृंद यांचा सन्मान करताना संस्था पदाधिकारी