बा विठ्ठला... कोरोनाचे संकट टळू दे अन् दर्शन घडू दे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:08 AM2021-07-04T04:08:32+5:302021-07-04T04:08:32+5:30
निमित्त होते संवाद पुणे, कृष्णकुमार गोयल फाउंडेशन आणि रामकृष्ण हरी प्रतिष्ठानतर्फे आयोजित स्वागत सोहळ्याचे. या सोहळ्यास महापौर मुरलीधर मोहोळ, ...
निमित्त होते संवाद पुणे, कृष्णकुमार गोयल फाउंडेशन आणि रामकृष्ण हरी प्रतिष्ठानतर्फे आयोजित स्वागत सोहळ्याचे. या सोहळ्यास महापौर मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, संत तुकाराम महाराज यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे, चैतन्य महाराज आळंदीकर, उद्योजक कृष्णकुमार गोयल, संवाद पुणेचे सुनील महाजन, मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, हभप संजय धुंडरे पाटील, हभप पंडित महाराज शिवकुमार, किरण साळी, हरिभाऊ चिकणे यांची उपस्थिती होती.
देहू येथून संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पुण्यात ह्या पालख्या एकत्र येतात. पण गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी सोहळा झालेला नाही. त्यामुळे या वर्षीही पालखी सोहळ्याचे प्रतीकात्मक स्वागत ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथेचे पूजन करून करण्यात आले. डॉ. सदानंद मोरे यांनी वारीच्या परंपरेविषयीची माहिती दिली. निकिता मोघे यांनी स्वागत केले. मंदार चिकणे यांनी आभार मानले.