बाबांनी ‘वेदना’ हाच ईश्वर मानला
By admin | Published: December 9, 2014 12:24 AM2014-12-09T00:24:52+5:302014-12-09T00:24:52+5:30
डॉ. बाबा आमटे यांनी मंदिरातला, मूर्तीमधला देव मानला नाही. पण लाखो महारोगी, अपंग, अंध, दुर्लक्षित, उपेक्षित वर्गातल्या रुग्णांमध्ये त्यांच्या वेदनांमध्ये ईश्वर मानला,
Next
पुणो : डॉ. बाबा आमटे यांनी मंदिरातला, मूर्तीमधला देव मानला नाही. पण लाखो महारोगी, अपंग, अंध, दुर्लक्षित, उपेक्षित वर्गातल्या रुग्णांमध्ये त्यांच्या वेदनांमध्ये ईश्वर मानला, अशा भावना डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केल्या.
कै. शंकरराव भोई प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आनंदवन येथील ‘स्वरानंदन’ या संगीतमय मैफिलीत सहभागी असणा:या रुग्णांशी व डॉ. विकास आमटे यांच्याशी पुण्यातील स्वयंसेवी संस्था व विविध गणोशोत्सव मंडळाच्या कार्यकत्र्याशी स्नेहसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी डॉ. आमटे बोलत होते.
या कार्यक्रमात डॉ. विकास आमटे यांनी आनंदवनच्या आत्तार्पयतच्या प्रवासातील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी दिलखुलास व अनौपचारिकरित्या उलगडल्या.
अॅड. प्रताप परदेशी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संयोजन भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी केले होते. लायन्स क्लब ऑफ पुणो सारसबागच्या वतीने अध्यक्ष विकास काळे यांनी आनंदवनातील रुग्णांसाठी ब्लॅँकेटस् भेट दिले. गायक इक्बाल सरदार यांनी आनंदवनातील रुग्णांसाठी संगीत मैफलीचे आयोजन केले होते.
या वेळी कॉसमॉस बॅँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सुनील परदेशी, शिरीष मोहिते, डॉ. नितीन बोरा, विवेक खटावकर, सुहास पाटील, नितीन करंदिरकर, विकास काळे आदी उपस्थित होते. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
प्रसिद्धी नको
4कार्यक्रमादरम्यान काही छायाचित्रकार छायाचित्र घेण्यासाठी सरसावले असता छायाचित्र काढू नका. मला प्रसिद्धीआवडत नाही. प्रसिद्धी माध्यमांकडे मी माङो छायाचित्र कधीही देत नाही, असे विकास आमटे यांनी सूचित केले.