बाळ बोठेचे पुस्तक अभ्याक्रमातून हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:29 AM2020-12-11T04:29:42+5:302020-12-11T04:29:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाने राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून निवडलेले बाळ बोठेचे पुस्तक अभ्यासक्रमातून ...

Baby Bothe's book expelled from the course | बाळ बोठेचे पुस्तक अभ्याक्रमातून हद्दपार

बाळ बोठेचे पुस्तक अभ्याक्रमातून हद्दपार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाने राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून निवडलेले बाळ बोठेचे पुस्तक अभ्यासक्रमातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या विद्या परिषदेतही हे पुस्तक रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येतील संशयीत मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेला बाळ बोठे अद्याप फरार आहे. त्याचे ‘राजकीय पत्रकारिता’ हे पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विषयाच्या ‘पॉलिटिकल जर्नलिझम’ या विशेष अभ्यासक्रमासाठी (एस-2) नेमण्यात आले आहे. गेल्या वर्षीपासूनच हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला.

नवीन विद्यापीठ कायद्यानुसार अभ्यास मंडळातील काही सदस्यांची निवड नॉमिनेशन मधून केली जाते. विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून बोठेला नॉमिनेट करण्यात आले होते. विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार गंभीर गुन्ह्यातील आरोपीला विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या बैठकीस उपस्थित राहण्यापासून मज्जाव करता येतो. तसेच अशा व्यक्तीचे सदस्यपद विद्यापीठाचे कुलगुरू रद्द करू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.

चौकट

सदस्यत्वही जाणार

“बाळ बोठेचे संदर्भ ग्रंथ म्हणून नियुक्त केलेले पुस्तक रद्द करण्याचा निर्णय घेतला असून विद्या परिषदेच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. बोठेचे अभ्यास मंडळ सदस्यत्व रद्द करण्याचाही निर्णय लवकरच घेण्यात येईल.”

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: Baby Bothe's book expelled from the course

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.