वासुंदेत नवजात अर्भकाचा मृत्यू, आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा मातेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 02:24 AM2018-05-27T02:24:12+5:302018-05-27T02:24:12+5:30

एकीकडे नवजात मुलांच्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. मात्र, वासुंदे येथील आरोग्य केंद्रात योग्य आणि वेळेत सुविधा न मिळाल्याने दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या नवजात अर्भकाचा शनिवारी पहाटे मृत्यू झाल्याचा आरोप नवजात अर्भकाच्या मातेने केला.

Baby child Death News | वासुंदेत नवजात अर्भकाचा मृत्यू, आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा मातेचा आरोप

वासुंदेत नवजात अर्भकाचा मृत्यू, आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा मातेचा आरोप

googlenewsNext

वासुंदे - एकीकडे नवजात मुलांच्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. मात्र, वासुंदे येथील आरोग्य केंद्रात योग्य आणि वेळेत सुविधा न मिळाल्याने दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या नवजात अर्भकाचा शनिवारी पहाटे मृत्यू झाल्याचा आरोप नवजात अर्भकाच्या मातेने केला.
वासुंदे येथील मनीषा राजेंद्र जांबले ही माता गुरुवारी (दि. २४) पहाटे घरीच सुखरूप प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. त्यानंतर मुलाचे वजन कमी असल्याचा संशय आल्याने तिने तत्काळ १०८ नंबरला फोन करून माहिती दिली. तसेच, गावातील उपकेंद्रामध्ये कार्यरत असलेल्या आरोग्यसेविकेसही याबाबतची कल्पना दिली. यानंतर १०८ नंबरच्या गाडीत बसून बाळंतीण, तिचा पती व कुटुंबातील इतर व्यक्ती पुढील उपचारांसाठी कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होण्यासाठी गेले. मात्र, पहाटेच्या सुमारास कुरकुंभ येथील आरोग्य केंद्राचे मेन गेट बंद दिसल्याने ही रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालय दौंड येथे गेली. या वेळी या रुग्णालयात उपस्थित असलेल्या कर्मचाºयांनी नॉर्मल डिलिव्हरी झाली असताना आपण कशासाठी आलात, असा प्रश्न विचारला. त्या वेळी अर्भकाच्या मातेने सांगितले, की ‘मला बाळाचे वजन कमी असल्याचे वाटते. तसेच पहिल्या बाळंतपणा वेळी माझा रक्तदाब कमीजास्त होत होता. त्यामुळे आम्ही दवाखान्यात आलो असून, मला पुढील उपचारांसाठी अ‍ॅडमिट करून घ्या.’
यानंतर रुग्णालयातील कर्मचाºयांनी बाळाचे वजन व्यवस्थित असल्याचे सांगितले व भरती करण्यासाठी जागा शिल्लक नसल्याचे कारण सांगून बाळ-बाळंतणीला घरी पाठविले. मात्र, परत येताना कोणतीही गाडीची व्यवस्था नसल्याने एसटी बस व खासगी वाहनाने या मातेला घरी यावे लागले.
त्यानंतर शनिवारी पहाटे या अर्भकाचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांनीच योग्य दखल न घेतल्याने मुलाचा मृत्यू झालाचा आरोप मातेने केला आहे.

मूकबधिर वडील व्यथा सागणार तरी कशी..?

- हे कुटुंब मोलमजुरी करून आपली उपजीविका करते. या नवजात अर्भकाचे वडील राजेंद्र बाबूराव जांबले हे मूकबधिर आहेत. ते स्वत: मूकबधिर असल्याने त्यांना येत असलेल्या अडचणी समजत असूनही आपली व्यथा व्यक्त करू शकले नाहीत. त्यामुळे १०८ नंबरला फोन करण्यापासून ते दवाखान्यातील कर्मचाºयांना अडचण सांगण्यापर्यंत सर्व गोष्टी या प्रसूत झालेल्या मातेला कराव्या लागल्या.

सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना योग्य शासकीय सेवा मिळत नसेल, तर शासकीय रुग्णालये कशासाठी आहेत? आज एका मूकबधिर कुटुंबावर आरोग्य विभागाच्या असंवेदनशीलतेमुळे एका निष्पाप मुलाला मुकावे लागले आहे. आजच्या प्रगत युगात मुलं होण्यासाठी कितीतरी मातापित्यांना लाखो रुपयांचा खर्च होऊनही पुत्रप्राप्ती होत नसल्याच्या अनेक घटना समाजासमोर आहेत. त्यामुळे नवजात अर्भकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
-नंदा जांबले, सरपंच ग्रामपंचायत वासुंदे

मला या घटनेची माहिती मिळाली आहे. सध्या मी रजेवर असल्याने दोन दिवसांत घटनेची सविस्तर माहिती घेण्यात येईल.
- राजेंद्र पाखरे, आरोग्य अधिकारी

मी सध्या सुटीवर आहे. मला याबाबत रुग्णालयातील कर्मचाºयांनी माहिती दिली आहे. घडलेल्या घटनेची माहिती घेऊन जबाबदार असणाºया कर्मचाºयांवर कारवाई करण्यात येईल.
- डॉ. रूपाली पाखरे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक, दौंड

Web Title: Baby child Death News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.