वेल्ह्याकडे पाठ, दुर्गम भागातील गाड्या बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2016 02:34 AM2016-04-25T02:34:17+5:302016-04-25T02:34:17+5:30

गाव तेथे रस्ता व रस्ता तेथे एसटी, असे शासनाचे धोरण वेल्हे तालुक्यात मात्र फोल ठरत आहे.

Back to Velha, shuttle trains in remote areas | वेल्ह्याकडे पाठ, दुर्गम भागातील गाड्या बंदच

वेल्ह्याकडे पाठ, दुर्गम भागातील गाड्या बंदच

Next

वेल्ह्याकडे पाठ
मार्गासनी : गाव तेथे रस्ता व रस्ता तेथे एसटी, असे शासनाचे धोरण वेल्हे तालुक्यात मात्र फोल ठरत आहे. तालुक्यात डोंगरी भागात एसटी महामंडळाच्या अपुऱ्या बसफेऱ्यांमुळे तसेच अनेक दुर्गम भागातील गाड्या महामंडळाकडून बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.
पुण्यापासून अवघ्या पन्नास किलोमीटरवर असलेल्या वेल्हे तालुक्याकडे एसटी महामंडळाने पाठ फिरवली आहे. या भागातील दुर्गम भागात जाणाऱ्या गाड्या महामंडळाने बंद केलेल्या आहेत. बसफेऱ्यांची संख्या कमी असल्याने या भागातील प्रवाशांना तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे. दुपारी चार वाजता शेवटची बस वेल्हे येथून सुटते. त्यानंतर वेल्हे येथून एकही बस पुण्याला जाण्यासाठी नसते.
स्वारगेटवरून सायंकाळी साडेचार वाजता गाडी वेल्ह्यास असते. त्यानंतर एकही गाडी नसल्याने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. तर वेल्ह्यातील शासकीय कर्मचारी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी तसेच पुण्याकडे जाणारे विद्यार्थी, चाकरमाने आदींची मोठी गैरसोय होत आहे.
तोरणा, राजगड, मढेघाट पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी होत आहे. राजगडच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे गावातून एसटी चार वाजता निघून जाते.
याबाबत स्वारगेट आगार व्यवस्थापकाकडे तक्रार केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. पुणे शहरात तसेच वेळू, शिवापूर, शिरवळ भागातून वेल्हेकडे येणारे चाकरमाने नियमित प्रवास करीत आहेत. परंतु शेवटची गाडी बंद झाल्याने त्यांचे अतोनात हाल होत आहेत.
तालुक्यातील मुक्कामी हारपूड, वांगणी, मंजाई आसनी, कोदापूर, निवी, भट्टी आदी तर मागील एक वर्षापासून बंदच केलेल्या आहेत. या तर पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी वेल्हेकर करीत आहेत.

Web Title: Back to Velha, shuttle trains in remote areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.