दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नीरेत साधेपणाने गणेशोत्सव

By admin | Published: September 24, 2015 02:53 AM2015-09-24T02:53:50+5:302015-09-24T02:53:50+5:30

पुरंदर तालुक्यातील नीरा शहरात यंदा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. काही मंडळांनी यंदा उत्सवामध्ये खर्चात काटकसर करून दुष्काळग्रस्तांना आर्थिक

On the backdrop of drought, normally the Ganesh Festival | दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नीरेत साधेपणाने गणेशोत्सव

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नीरेत साधेपणाने गणेशोत्सव

Next

नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा शहरात यंदा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. काही मंडळांनी यंदा उत्सवामध्ये खर्चात काटकसर करून दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविणारी मंडळे देखील साधेपणाने गणेशोत्सव साजरा करत आहेत.
पुरंदर तालुक्यात गणेशोत्सवामध्ये दरवर्षी विविध समाजप्रबोधनपर तसेच ऐतिहासिक आकर्षक देखावे सादर करण्यामध्ये नीरा शहरातील गणेश मंडळांची आघाडी असते.
मात्र, यंदा नीरा बाजारपेठेवर दुष्काळी स्थितीचा गंभीर परिणाम झाल्याने नीरा शहरातील गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र यंदा नीरा गणेशोत्सवात आकर्षक देखावे नसल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
नीरा शहरातील सर्वांत जुन्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा फुग्यांची आकर्षक सजावट करून साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने खर्चात काटकसर करून दुष्काळग्रस्तांना दहा हजार रुपयांची मदत करण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्रिमूर्ती गणेश मंडळाने यंदा सुवर्णमंदिराचा देखावा सादर केला आहे. हनुमान तरुण मंडळाने तर वीर येथील देवस्थान म्हस्कोबा मंदिराचा देखावा सादर केला आहे.
नीरेतील जय भवानी - जीवनदीप तरुण मंडळ, शिवाजी तरुण मंडळ, बुवासाहेब तरुण मंडळ, शिवगणेश तरुण मंडळ, कानिफनाथ तरुण मंडळ, अमरदीप तरुण मंडळ, अष्टविनायक तरुण मंडळ, गणराज तरुण मंडळ, स्वराज्य मित्र मंडळ आदी विविध छोटी-मोठी मंडळे साधेपणाने गणेशोत्सव साजरा करत आहेत. या मंडळांपैकी काही मंडळांकडून दुष्काळग्रस्तांसाठी आर्थिक मदत केली जाणार असल्याचे संबंधित मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. काही मंडळांनी करमणुकीचे कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचे आयोजन करून आकर्षक पारितोषिके जाहीर केली आहेत.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक रामदास शेळके, फौजदार श्रीकांत देव यांच्यासह पोलीस हवालदार सुदर्शन होळकर, सुरेश गायकवाड, घनश्याम चव्हाण आदी पोलीस आणि होमगार्ड कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
(वार्ताहर)

Web Title: On the backdrop of drought, normally the Ganesh Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.