जिल्ह्यातील महामार्गाची झाली दुर्दशा; अपघातात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 12:27 PM2019-05-07T12:27:15+5:302019-05-07T12:33:53+5:30

गतिरोधक पूर्णपणे उखडले; अपघात होण्याची शक्यता.....

bad condition of the highway in the district; Increase in the accident | जिल्ह्यातील महामार्गाची झाली दुर्दशा; अपघातात वाढ

जिल्ह्यातील महामार्गाची झाली दुर्दशा; अपघातात वाढ

Next
ठळक मुद्देमुसळधार पाऊस झाला तर महामार्ग पूर्ण खचल्याशिवाय राहणार नाहीपुणे-सातारा महामार्गाच्या कामाची तपासणी तज्ज्ञांकडून करण्याची मागणीरस्त्याच्या भरावाच्या कामात कामचुकारपणा असेल, तर मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्तअधिकाऱ्यांच्या बेपरवाईमुळे महामार्गावरून जाणाऱ्या हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात

नसरापूर : पुणे-सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ च्या सहापदरीकरणाचे काम सुरू असून, हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची बाब नसरापूर- चेलाडी येथे होत असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या भिंतीला बाहेरच्या बाजूने फुगवटा आल्याचे वेळेत नागरिकांच्या सतर्कतेमुळे लक्षात आल्याने वेळीच बांधकाम कर्मचाऱ्यांनी धोकादायक बांधकाम पुन्हा काढून पुढचा अनर्थ टाळला.
गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून पुणे-सातारा-पुणे महामार्गावरील नसरापूर येथील चेलाडी फाट्यावर उड्डाणपुलाचे बांधकाम चालू आहे. या सुरू असलेल्या पुणे-सातारा बाजूच्या महामार्गावरील पुलाच्या भिंतीला सुरू कामातच काम दोरीत न झाल्याने भिंतीला बाहेरील बाजूने फुगवटा आल्याने ते वाहतुकीच्या रस्त्यावर पडू शकले असते. पुलाच्या भिंतीचे बांधकाम निकृष्ट व धोकादायक झाले होते ते स्थानिक नागरिकांनी काम करत असलेल्या कामगारांच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे पुढचा धोका टळला. त्यामुळे काम करत असलेल्या कामगारांनी सुमारे तीस ते पस्तीस फूट लांब व ते पंचवीस फूट उंच बांधकाम पुन्हा उकरून काढावे लागले आहे. बांधकाम सुरू असलेल्या पुलाच्या लगत दोन्ही बाजूने राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे ये-जा करणाºया अवजड वाहनांची मोठी संख्या असते. या वाहनांवर या भिंतीचे बांधकाम पडले असते, तर मोठा अनर्थ घडला असता असे प्रवाशांनी सांगितले. 
...
* महामार्ग सहापदरीकरण करणाऱ्या कंपनीने सक्षमीकरणाकडे या कामात गांभीर्याने पाहिले नसल्यामुळे पहिल्याच पावसानंतर महामार्गावरील हा रस्ता खचून जाईल की काय, अशी भीती नागरिकांमधून व प्रवाशांमधून व्यक्त केली जात आहे. 

* अद्याप पाऊस नसला, तरीदेखील मुसळधार पाऊस झाला तर महामार्ग पूर्ण खचल्याशिवाय राहणार नाही. यामुळे या महामार्गाची तज्ज्ञांकडून तपासणी करून चौकशीअंती संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. 

* पुणे-सातारा महामार्गाच्या कामाची तपासणी तज्ज्ञांकडून करण्याची मागणी प्रवाशांनी व तालुक्यातील ग्रामस्थांनी केली आहे. नसरापूर येथील चेलाडी फाट्यावरील महामार्गावरील पुलाच्या भरावाच्या भिंतीचे, रस्त्याच्या भरावाच्या कामात कामचुकारपणा असेल, तर मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच या पुलालगत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माध्यमिक विद्यालय आहे

..............
* काटी : वडापुरी (ता. इंदापूर) ते अवसरी या रस्त्याच्या कडेला असलेल्या निंबाळकर वस्ती व जाधववस्ती येथे वळणाचा रस्ता आहे. तसेच रस्ता नव्याने झाल्याने वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. अपघातप्रवण ठिकाणी वाहनांच्या वेगावर आवर घालण्यासाठी तसेच लोकवस्तीमध्ये वाहनांची गती कमी करण्यासाठी ताबडतोब गतिरोधक बसविण्याचे गरजेचे असल्यामुळे गतिरोधक बसवण्याची मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.
........
गतिरोधक नाही बसवला तर पंचायत समिती इंदापूर येथे आंदोलन करू असा इशारा हरिभाऊ जाधव, हर्षद जाधव, सागर जाधव, शंकर जाधव, सूरज जाधव, युवराज करगळ यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.

.......

* गतिरोधक पूर्णपणे उखडले; अपघात होण्याची शक्यता.....
वाहतुकीपुढे हे रबरी गतिरोधक टिकाव धरू शकले नाहीत. 
बसविल्यानंतर पाच ते सहा महिन्यांत हे गतिरोधक पूर्णपणे उखडले असून, या ठिकाणी वाहनांची पुन्हा वेगात ये-जा सुरू झाली आहे. 
या  दोन्ही ठिकाणी नेहमीच प्रवाशांची व विद्यार्थ्यांची गर्दी असल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. या ठकाणी डांबर 
वापरून पक्के गतिरोधक बसवावेत, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.  .

* आणे : आणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ वर बसविलेले गतिरोधक पूर्णपणे उखडले असून, वेगात जाणाºया वाहनांमुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे.  गेल्या वर्षी येथील सरदार पटेल हायस्कूलकडे जाणाºया रस्त्यावर (नांदूर चौक) झालेल्या अपघातात एक शालेय विद्यार्थी जखमी झाला होता. त्या वेळी संतप्त ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनानंतर नांदूर चौक तसेच बसस्थानक या ठिकाणी महामार्गावर रबरी गतिरोधक बसविण्यात आले होते. परंतु या महामार्गावर असणाºया अवजड वाहनांच्या प्रचंड 
.............

* पुणे-सातारा - पुणे महामार्गाच्या कामाची तपासणी तज्ज्ञांकडून करण्याची मागणी प्रवाशांनी व तालुक्यातील ग्रामस्थांनी केली आहे. नसरापूर येथील चेलाडी फाट्यावरील महामार्गावरील पुलाच्या भरावाच्या भिंतीचे, रस्त्याच्या भरावाच्या कामात कामचुकारपणा असेल, तर मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच या पुलालगत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माध्यमिक विद्यालय आहे.

........

* पुण्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक, पुणे-सोलापूर, पुणे-नगर पुणे-बंगलोर तसेच पुणे-मुंबई या सर्वच मार्गाची पुरेशा देखभाली अभावी दुर्दशा झाली आहे.अनेक ठिकाणी गती रोधक उखडले आहेत. त्यामुळे भरधाव जाणाऱ्या वाहनांचे अपघात वाढले आहेत. त्यात नाहक बळी जात आहेत.

*वडापुरी गावाच्या शेजारी असलेले भाडगाव म्हसोबा देवस्थानकडे जाणारे भाविक या रस्त्याने मोठ्या संख्येने जात असतात. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. तसेच जाधववस्तीच्या शेजारी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे, त्या शाळेला संरक्षक भिंत नसल्यामुळे लहान मुले मधल्या सुट्टीत रस्यावर ये-जा सुरू असते. या मार्गावर कामानिमित्त येणारे तालुक्यातील नागरिक, ग्रामीण भागातील शेतकरी आदींची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. 

* या ठिकाणी किरकोळ अपघात सतत होत असतात. भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावर तातडीने गतिरोधक उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी नसरापूरनजीकच्या उड्डाणपुलाची निर्मितीच चुकीची झाल्याचे अधिकाऱ्यांच्याऐवजी नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनीच पुढाकार घेऊन काम बंद पाडले व पुन्हा नव्याने उड्डाण पुलाची भिंत अधिकाऱ्यांना उभी करावी लागली. यावरूनच महामार्गाच्या निर्मिती व दुरूस्ती करणाऱ्या कंपनीचे किती लक्ष आहे ते स्पष्ट होते. 

* अधिकाऱ्यांच्या बेपरवाईमुळे महामार्गावरून जाणाऱ्या हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. आणे येथे गतिरोधकांची दुर्दशा 
झाली आहे.

Web Title: bad condition of the highway in the district; Increase in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.