खरपुडी खुर्द रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:10 AM2020-12-29T04:10:28+5:302020-12-29T04:10:28+5:30
दावडी: खरपुडी खुर्द (ता खेड ) येथील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याची दुरवस्था होऊन खड्यात दुचाकी आपटुन अपघात ...
दावडी: खरपुडी खुर्द (ता खेड ) येथील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याची दुरवस्था होऊन खड्यात दुचाकी आपटुन अपघात होत आहे. तसेच भीमा नदीपात्रातील पुलाला संरक्षक कठडे नसल्या अपघात होण्याची शक्यता आहे.या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, व संरक्षक कठडे बसवावेत अशी मागणी होत आहे.
खरपुडी बुद्रुक ते खरपुडी खुर्द हा रस्ता भीमा नदीपात्रावरून पूल करून करण्यात आला आहे. त्यामुळे खरपुडी येथील खंडोबा देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची व ग्रामस्थांची चांगली सोय झाली आहे. हा रस्ता पुढे वाकी, काळूस, भाम, चाकण या गावाकडे व शहराकडे जातो. त्यामुळे निमगाव, दावडी, रेटवडी, खरपुडी येथील कंपनी कामगार यांना चाकण येथे ये - जा करण्यासाठी जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्याने वाहनांची वर्दळ वाढली आहे. तसेच शेतकऱ्यांनाही शेतमाल चाकण विक्री करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात.. दोन वर्षापुर्वी या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले मात्र काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने सध्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. एक कीलोमीटर अंतराच्या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत,रस्त्याच्या साईट पट्टया खचल्या आहेत.
रस्ता अरुंद झाला असून समोरासमोर डबल वाहन आल्यास रस्त्याच्या खाली वाहन उतरल्यास वाहनांची चाके रुतून वाहन अडकून पडत आहे. तसेच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकीस्वारास खड्यांचा अंदाज येत नाही. दुचाकीस्वार घसरुन अपघात होत आहे. तसेच अनेक भाविक जवळचा मार्ग म्हणून खरपुडी येथे खंडोबा देवाच्या दर्शनासाठी येत असतात. या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे भाविकांनाही या रस्त्याने प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे विनाकारण या रस्त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. तसेच भिमानदीपात्रावर उभारण्यात आलेल्या लोखंडी संरक्षक कठडे नसल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पुलाला लोखंडी संरक्षक कठडे बसवावेत अशीही मागणी होत आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी खंडोबा देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष सोपान गाडे, हिरामण मलघे, बंडोपंत गाडे, निवृत्ती गाडे, राजेश गाडे, संदिप गाडे याच्यासह ग्रामस्थ व वाहनचालकांनी केली आहे.
खरपुडी खुर्द येथे खंडोबा मंदीर व गावकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेले खड्डे
२८ दावडी
पुलाला संरक्षक कठडे नसल्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे.
२८ दावडी १