पाणीपट्टी चुकविणाऱ्या श्रीमंतांवर बडगा..!

By admin | Published: January 13, 2017 02:26 AM2017-01-13T02:26:52+5:302017-01-13T02:26:52+5:30

पाणीपट्टी चुकविणाऱ्या धनधांडग्यांना जरब बसविण्यासाठी जलसंपदा खाते सरसावले आहे.

Badge on those who missed the water tank ..! | पाणीपट्टी चुकविणाऱ्या श्रीमंतांवर बडगा..!

पाणीपट्टी चुकविणाऱ्या श्रीमंतांवर बडगा..!

Next

बारामती : पाणीपट्टी चुकविणाऱ्या धनधांडग्यांना जरब बसविण्यासाठी जलसंपदा खाते सरसावले आहे. ५ ते १० वर्षांपासून या धनदांडग्या बागायतदारांकडे मोठ्या रकमेची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी आता या बड्या शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर थकीत पाणीपट्टीच्या रकमेचा बोजा चढविण्यात येणार आहे.
बारामती, इंदापूर तालुक्यातील शेतीला नीरा डावा कालव्यातील पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी जलसंपदा खात्याच्या वतीने प्रतिएकरनुसार पाणीपट्टी आकारणी करण्यात येते. नोटाबंदीनंतर सर्व शासकीय खात्यांच्या थकीत रकमेसाठी जुन्या नोटा भरणा करण्याची मुभा शासनाने दिली होती. त्यामुळे जुन्या नोटांचा भरणा करून थकबाकी भरण्यासाठी पाटबंधारे खाते वगळता सर्व शासकीय खात्यांना वसुलीला चांगला प्रतिसाद मिळाला. महावितरण, नगरपालिका, आरटीओ आदी कार्यालयांमध्ये लाखोंचा भरणादेखील झाला. मात्र, पाटबंधारे खात्याकडे पाठ फिरविली. त्यामुळे अल्प प्रमाणात खात्याला पाणीपट्टी वसुलीला प्रतिसाद मिळाला. बारामती आणि पणदरे पाटबंधारे उपविभागाकडे नोव्हेंबर २०१६ अखेर एकूण ९ कोटी ४ लाख ५७ हजार रुपये थकबाकी होती. त्यापैकी नोटाबंदीच्या काळात जुन्या नोटांच्या भरण्याद्वारे दोन्ही उपविभागांत४ लाख ५५ हजार रुपयांची वसुली झाली.
जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता ए. आर. भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की सध्या थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांवर हा बोजा चढविला जाणार नाही. मात्र, ५ ते १० वर्षांपासून थकबाकी असणाऱ्या धनदांडग्यांचे प्रमाण अधिक आहे. ५ हजारांपासून अगदी १ लाखापर्यंत ही थकबाकी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून थकबाकी असलेल्या धनदांडग्यांच्या सात-बारा उताऱ्यावर संबंधित रकमेचा बोजा चढविला जाणार आहे. संबंधित रक्कम आणि नावे तहसील कार्यालयाला कळविण्यात आली आहेत.

पाटबंधारे खाते सरसावले, कळवूनही वसुली झाली नाही


१ ते २ वर्षांची चालू थकबाकी असलेले शेतकरी थकबाकी भरतात. काही आर्थिक अडचणींमुळे थकबाकी भरण्यासाठी या शेतकऱ्यांकडून विलंब होतो. मात्र, पाणीपट्टी भरली जाते. मात्र, गेल्या ५ ते १० वर्षांपासून थकीत असणारी पाणीपट्टी वसूल करण्यासाठी पाटबंधारे खाते सरसावले आहे.
साखर कारखान्यांना कळवूनदेखील मोठे थकबाकीदारांकडून वसुली झाली नाही. मागेल तेवढे पाणी घ्यायचे. वर्षानुवर्षे पाणीपट्टी न भरण्याची यांची मानसिकता आहे. त्यामुळे सात-बारा उताऱ्यावर बोजा चढविण्याशिवाय पर्याय नाही. या धनदांडग्यांच्या सात-बारा उताऱ्यावर आता बोजा चढविण्याची प्रक्रिया जलसंपदा विभागाने सुरू केली आहे.

Web Title: Badge on those who missed the water tank ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.