पणदरे खिंडीतील वळणे धोकादायक

By admin | Published: November 26, 2015 12:59 AM2015-11-26T00:59:10+5:302015-11-26T00:59:10+5:30

तीव्र उतार व नागमोडी वळणे देतात अपघाताला निमंत्रण. संरक्षक कठड्यांच्या अभावामुळे माळेगाव, पणदरे गावाच्या पश्चिमेला असलेल्या खिंडीचा प्रवास जीवघेणा ठरत चालला आहे.

Badlands turn dangerous | पणदरे खिंडीतील वळणे धोकादायक

पणदरे खिंडीतील वळणे धोकादायक

Next

माळेगाव : तीव्र उतार व नागमोडी वळणे देतात अपघाताला निमंत्रण. संरक्षक कठड्यांच्या अभावामुळे माळेगाव, पणदरे गावाच्या पश्चिमेला असलेल्या खिंडीचा प्रवास जीवघेणा ठरत चालला आहे. छोटे-मोठे अपघात तर आता नित्याचीच बाब बनत चालले आहेत. नीरा-बारामती या वर्दळीच्या मार्गावर असलेली खिंड दिसायला छोटी व सहज सोपी वाटत असली, तरी खिंडीच्या दोन्ही बाजूंना असलेला तीव्र उतार व नागमोडी वळणे यांमुळे वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागते.
या खिंडीला केवळ तीनच वळणे असूनही अपघाताचे प्रमाण अधिक आहे. आजवर झालेल्या अपघातांमध्ये कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या खिंडीला तीव्र चढ व उतार असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. रात्रीच्या वेळी अंदाज न आल्याने नीरेकडून येणारी वाहने थेट ४० ते ५० फूट खोल खड्ड्यात जाऊन पडतात. तर, बारामतीकडून येणारी वाहने सरळ डोंगरावर जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्त व जीवित हानी होते. अशी परिस्थिती असतानादेखील दोन्ही वळणांवर कोणत्याही प्रकारचे संरक्षक कठडे उभारण्यात आलेले नाहीत. रस्त्याची खड्डे पडून चांगलीच दुरवस्था झाली आहे. (वार्ताहर)
ऊस वाहतूकदारांची तारेवरची कसरत...
४माळेगाव सहकारी साखर कारखाना व सोमेश्वर साखर कारखान्याला याच खिंडीतून उसाची वाहतूक केली जाते. उसाचे ट्रॅक्टर, ट्रक व बैलगाड्या चालकांना अपघाताला सामोरे जावे लागते. ओव्हरलोड केल्याने व एकाच वेळी दोन-दोन ट्रेलर घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असे अपघात होतात. खिंडीला केवळ तीनच वळणे असूनही अपघाताचे प्रमाण अधिक आहे. आजवर झालेल्या अपघातांमध्ये कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
वाहनचालक खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघाताला निमंत्रण देत आहेत. केवळ खड्डे बुजविण्याव्यतिरिक्त कोणतेच काम होताना दिसत नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका मात्र सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत आसल्याचे दृश्य आहे. या भागात वळणांवर संरक्षक कठडे उभारण्याबरोबरच पांढरे पट्टे व रेडियमच्या चमकणाऱ्या पट्ट्या लावण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

Web Title: Badlands turn dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.