बॅडमिंटन स्पर्धा : आमोद, शर्मन, मानस संघर्षपूर्ण विजयासह चौथ्या फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 01:50 AM2018-12-26T01:50:20+5:302018-12-26T01:50:37+5:30

आमोद पानवकर, शर्मन घुबे, मानस पाटील यांनी पीवायसी आणि हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशन आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून चौथ्या फेरीत प्रवेश केला.

 Badminton tournament: Amod, Sherman, Manas in fourth round with struggling victories | बॅडमिंटन स्पर्धा : आमोद, शर्मन, मानस संघर्षपूर्ण विजयासह चौथ्या फेरीत

बॅडमिंटन स्पर्धा : आमोद, शर्मन, मानस संघर्षपूर्ण विजयासह चौथ्या फेरीत

Next

पुणे : आमोद पानवकर, शर्मन घुबे, मानस पाटील यांनी पीवायसी आणि हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशन आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून चौथ्या फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखानाच्या बॅटमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलांच्या एकेरीतील तिसऱ्या फेरीत आमोदने मानस गणात्रावर १५-१२, ९-१५, १५-७ असा, तर शर्मन घुबेने स्वप्निल खांडेकरवर १४-१५, १५-६, १५-८ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला आणि चौथ्या फेरीत प्रवेश केला. मानस पाटील यालाही तिसºया फेरीचा अडथळा पार करताना चांगलाच संघर्ष करावा लागला. मानसने मनन गुप्ताचे आव्हान ८-१५, १५-१३, १५-१३ असे परतवून लावले. मानसची आता सहाव्या मानांकित अनय चौधरीशी लढत होईल. अनयने अभय पवारवर १५-४, १५-३ असा सहज विजय मिळवला. अग्रमानांकित प्रथम वाणीने अनिश लाटकरला १५-३, १५-४, असे रुचिर प्रभुणेने सोहम हळबेला १५-१०, १५-८ असे नमवून आगेकूच केली. रोनक गुप्ताने आयुष श्रीवास्तवला १५-८, १५-५ असे सोहम भुतकरने मयांक राऊतला १५-१३, १५-८ असे सहज पराभूत करून चौथी फेरी गाठली.
१३ वर्षांखालील मुले : तिसरी फेरी - आद्य पारसनीस वि. वि. नमन सुधीर १५-५, १५-९; कृष्णा बोरा वि. वि. ईशान केळकर १५-१, १५-६; देवेश गोयल वि. वि. सुदीप फणसळकर १५-४, १५-५; अथर्व चिवटे वि. वि. नील लुणावत १५-९, १५-१०; आदित्य देशमुख वि. वि. इशान वायचळ १५-६, १५-६; सार्थक शेलार वि. वि. मल्हार मोकाशी १५-९, १५-१०; यशराज कदम वि. वि. ध्रुव मासळेकर १५-३, १५-१; श्रेयस साने वि. वि. अर्जुन खानविलकर १५-२, १५-२; निखिल चितळे वि. वि. अमेय बेल्हेकर १५-१३, १५-११; वरुण गंगवार वि. वि. आदित्य देशमुख १५-९, १५-५; जीत काकडे वि. वि. रुचिर मांडे १२-१५, १५-१२, १५-१०; समर्थ साठे वि. वि. ओजस जोशी १५-६, १५-८; अर्जुन भगत वि. वि. पुष्कर कामठे १५-७, १५-५. १५ वर्षांखालील मुली : तिसरी फेरी - साद धर्माधिकारी वि. वि. शुची देशपांडे १५-६, १५-१; सानिका पाटणकर वि. वि. पाखी जैन १३-१५, १५-६, १५-१४; अनन्या अगरवाल वि. वि. सलोनी तपस्वी १५-६, १०-१५, १५-५; श्रेया शेलार वि. वि. अंशिता गुप्ता १५-६, १५-३; नेहल प्रभुणे वि. वि. भूमी वैशंपायन १५-४, १५-६; श्रेया भोसले वि. वि. श्रावणी दुरफे १५-१०, ९-१५, १५-११; मनस्वी बोरा वि. वि. रिया भालेराव १५-९, १५-

निकाल : ११ वर्षांखालील मुली : तिसरी फेरी - जुई जाधव वि. वि. रुही भिसे १५-१०, १५-१२; श्रिया खराडे वि. वि. सायली अलोनी १५-७, १५-६; स्वामिनी तिकोणे वि. वि. पूर्वा वलावंडे १५-९, १५-३; पीयुषा फडके वि. वि. इरा आपटे १५-८, १५-५; सुखदा लोकापुरे वि. वि. सिया बेहेडे १५-६, १५-७; अंजली तोंडे वि. वि. प्राची पटवर्धन १५-९, १५-७; जुई हळणकर वि. वि. सारा गुजराथी १५-८, १५-६; इशिका मेदाने वि. वि. इरा आचार्य १५-२, १५-२; आद्य जोशी वि. वि. अन्वी बेहेडे ९-१५, १५-१०, १५-७; युतिका चव्हाण वि. वि. याश्वी पटेल १५-१०, १५-१४; अद्विका जोशी वि. वि. राधा गाडगीळ १५-१२, १५-११.
मुले : अवधूत कदम वि. वि. अर्जुन देशपांडे १५-५, १५-७; आर्यन बागल वि. वि. रिशित पुडकेय १५-५, १५-७; वरद वैद्य वि. वि. सोहम धामे ९-१५, १५-१३, १५-५; केविन पटेल वि. वि. आरव रघुवंशी १५-९, १५-४; अजिंक्य कुलकर्णी वि. वि. सिद्धान्त तिवारी १५-४, १५-८; श्रेयस लागू वि. वि. अर्जुन खानविलकर १५-९, १५-१३; सुदीप खोराटे वि. वि. ओम बाबर १५-६, १५-१; कोणार्क इंचेकर वि. वि. तनिष्क अदे १५-७, १५-५; सार्थक पाटणकर वि. वि. ओम दरेकर १५-७, १५-४.

Web Title:  Badminton tournament: Amod, Sherman, Manas in fourth round with struggling victories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.