बॅडमिंटन स्पर्धा : अनन्या, महेश, नुपूर, मानसी यांना दुहेरी मुकुट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 01:24 AM2018-12-29T01:24:05+5:302018-12-29T01:24:31+5:30

अनन्या गाडगीळ, महेश उतगिकर, नुपूर सहस्त्रबुद्धे, मानसी गाडगीळ, समीर भागवत, हर्षद भागवत यांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पीवायसी आणि हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशन आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी यश संपादन केले.

Badminton tournament: Ananya, Mahesh, Nupur, Mansi double crown | बॅडमिंटन स्पर्धा : अनन्या, महेश, नुपूर, मानसी यांना दुहेरी मुकुट

बॅडमिंटन स्पर्धा : अनन्या, महेश, नुपूर, मानसी यांना दुहेरी मुकुट

Next

पुणे : अनन्या गाडगीळ, महेश उतगिकर, नुपूर सहस्त्रबुद्धे, मानसी गाडगीळ, समीर भागवत, हर्षद भागवत यांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पीवायसी आणि हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशन आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी यश संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखाना येथिल बॅडमिंटन कोर्टवर संपलेल्या या स्पर्धेतील १३ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत दुसरी मानांकित अनन्याने आंचल जैनवर २१-१९, २१-११ गुणांनी मात केली. त्यानंतर अनन्याने १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीतील अंतिम फेरीत चौथ्या मानांकित रिद्धी पुडकेवर २१-१४, २१-१४ गुणांनी २९ मिनिटांत विजय मिळवला विजेतेपदासह दुहेरी यश मिळवले. अनन्या हि अरण्येश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिकते. नीता केळकर यांच्याकडे ती बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेत आहे.

महेश उतगिकरने ४० वर्षांखालील पुरुष दुहेरी आणि ४० वर्षांखालील मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळवले. स्पर्धेतील ४० वर्षांखालील पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत महेश-अमित देवधर या अग्रमानांकित जोडीने महेश कुलकर्णी-विक्रांत पाटील या जोडीवर २१-९, २१-८
अशी मात केली. यानंतर मिश्र दुहेरीत महेश उतगिकर-चैत्राली नव्हरे जोडीने अर्जुन भगत-प्रेरणा जोशी जोडीवर २१-५, २१-१५ असा विजय मिळवला. नुपूर सहस्त्रबुद्धेने महिला दुहेरी आणि ३० वर्षांखालील मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळवले.

महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत नुपूर सहस्त्रबुद्धे-मानसी गाडगीळ या अग्रमानांकित जोडीने आदिती काळे- रिया जाईल या दुसऱ्या मानांकित जोडीवर २१-१८, २१-१४ असा विजय मिळवला. यानंतर मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत नुपूरने समीर भागवत यांच्या साथीने केदार नागमोडे-दीप्ती सरदेसाई जोडीवर २१-११, २१-९ अशी मात केली. मानसी गाडगीळने महिला दुहेरीच्यापाठोपाठ मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळवले. तिने मिश्र दुहेरीच्या समीर भागवतसह खेळताना अजित कुंभार-रिया जाईल जोडीवर २१-१८, २१-१५ अशी मात केली.
हर्षद भागवतने ३० वर्षांखालील पुरुष एकेरी आणि पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवले. ३० वर्षांखालील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत चौथ्या मानांकित हर्षद भागवतने जयंत पारखीवर २१-१४, २१-९ अशी मात केली. यानंतर दुहेरीच्या अंतिम फेरीत हर्षद भागवत-अजित उमराणी जोडीने केदार नाडगोंडे-तेजस किंजवडेकर जोडीवर २१-८, २१-१० अशी मात केली.

Web Title: Badminton tournament: Ananya, Mahesh, Nupur, Mansi double crown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.