आव्हान स्विकारता येत नाही म्हणून बाबांची पळवाट; संत्संग कशाला, तज्ज्ञांसमोर या, 'अंनिस' ची टीका
By राजू इनामदार | Updated: November 20, 2023 20:23 IST2023-11-20T20:20:53+5:302023-11-20T20:23:10+5:30
वकील, पोलीस अधिकारी, निवडक कार्यकर्ते, विविध क्ष्रेत्रतील निवडक तज्ञ मंडळींची समिती यांच्यासमोर बागेश्वर बाबांनी आपले अशास्त्रीय दावे सिद्ध करावेत

आव्हान स्विकारता येत नाही म्हणून बाबांची पळवाट; संत्संग कशाला, तज्ज्ञांसमोर या, 'अंनिस' ची टीका
पुणे: बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांना आम्ही दिलेले आव्हान हे तज्ज्ञांसमोर आपले अवैज्ञानिक दावे सिद्ध करण्याचे आहे. ते स्विकारण्याऐवजी बाबा संत्सगात समोरासमोर या असे म्हणतात. याचा अर्थ ते पळवाट काढत आहेत असाच होतो अशी टीका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली. आपले सगळे दावे, वक्तव्ये बाबाने सिद्ध करून दाखवावेत व २१ लाखाने जाहीर केलेले बक्षिस घेऊन जावे असे समितीने म्हटले आहे.
अंनिसचे पदाधिकारी विशाल विमल यांनी सांगितले की आव्हान स्विकारायचे असते तर बाबा कोणत्याही तज्ज्ञांसमोर यायला तयार झाले असते. हे तज्ज्ञ म्हणजे वकील, पोलीस अधिकारी, निवडक कार्यकर्ते, विविध क्ष्रेत्रतील निवडक तज्ञ मंडळींची समिती आहे. त्यांच्यासमोर आपले अशास्त्रीय दावे सिद्ध करण्यात बाबाला कोणती अडचण आहे ते सांगावे.
अंनिसने आजवर विविध धर्मीय बुवाबाबा आणि अम्मा ताईंच्या अशास्त्रीय दाव्यांचा पर्दापाश केला आहे. अंनिसचे आव्हान व भूमिका घटनेला धरून आहे तर बाबांचे वक्तव्य घटनेशी द्रोह करणारे आहे. यामुळे सरकारने या प्रकरणाकडे केवळ बघ्याच्या भूमिकेतून न पाहता बाबावर कारवाई करण्याची पावले उचलावीत असे विशाल विमल म्हणाले.