बारा कोटींच्या करमणूककराचा ‘बाहुबली’

By admin | Published: June 3, 2017 02:37 AM2017-06-03T02:37:32+5:302017-06-03T02:37:32+5:30

बॉक्स आॅफिसवरील सर्व विक्रम मोडीत काढणाऱ्या ‘बाहुबली २’ मुळे जिल्ह्यामधून अवघ्या एकाच महिन्यात तब्बल १२ कोटी ५८ लाखांचा

'Bahubali' of entertainment worth Rs. 12 crores | बारा कोटींच्या करमणूककराचा ‘बाहुबली’

बारा कोटींच्या करमणूककराचा ‘बाहुबली’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बॉक्स आॅफिसवरील सर्व विक्रम मोडीत काढणाऱ्या ‘बाहुबली २’ मुळे जिल्ह्यामधून अवघ्या एकाच महिन्यात तब्बल १२ कोटी ५८ लाखांचा करमणूक कर प्रशासनाला मिळाला आहे. एका महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर मिळवून देणारा बाहुबली हा आजवरचा एकमेव सिनेमा ठरला आहे.
शहरातील २५ मल्टीप्लेक्स, मल्टीस्क्रिन आणि ३१ सिनेमागृहांमधून महिन्याला साधारणपणे चार कोटींच्या आसपास करमणूककर मिळतो. २८ एप्रिल रोजी बाहुबली २ हिंदी, तेलुगु सह पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद लाभला. पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच सिनेमागृहांमध्ये या चित्रपटाचे तीनपेक्षा जास्त खेळ चालू आहे. सिनेमा येऊन एक महिना उलटल्यानंतरही तिकीटबारीवर अद्यापही बाहुबलीच ‘भाव’ खात आहे.
हा सिनेमा जिल्हा प्रशासनाच्या मात्र पथ्यावर पडला असून एका महिन्यातच १२ कोटी ५८ लाखांचा करमणूककर प्रशासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. बाहुबली २ मुळे आजवरचा सर्वाधिक कर
मिळाला आहे. आगामी काळात ट्यूबलाईट, रोबोसारखे बिगबजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांमधूनही चांगला कर मिळण्याची शक्यता करमणूकर विभागाच्या तहसीलदार सुषमा पाटील-चौधरी यांनी सांगितले.

Web Title: 'Bahubali' of entertainment worth Rs. 12 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.