‘व्हॉट्सअॅप’च्या माध्यमातून विनयभंग करणाऱ्याचा फेटाळला जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:12 AM2021-06-16T04:12:37+5:302021-06-16T04:12:37+5:30
पुणे : व्हॉट्सअॅप क्रमांकावरून महिलांना अश्लील मेसेज व व्हिडिओ कॉल करून विनयभंग केल्याप्रकरणी एकाला वाकड पोलिसांनी अटक केली. परंतु, ...
पुणे : व्हॉट्सअॅप क्रमांकावरून महिलांना अश्लील मेसेज व व्हिडिओ कॉल करून विनयभंग केल्याप्रकरणी एकाला वाकड पोलिसांनी अटक केली. परंतु, त्याने जामीन मिळावा यासाठी केलेला अर्ज शिवाजीनगर न्यायालयाने फेटाळला.
वाकड पोलिसांनी या विनयभंगप्रकरणी तपास करीत संपत राम याला अटक केली होती. पोलीस कोठडीदरम्यान त्याच्याकडे तपास केला असता, आरोपीने बऱ्याच महिलांसोबत असे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी यासंदर्भात पीडित महिलांना पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रसिद्धी माध्यमांद्वारे केले होते. त्यानंतर आणखी दोन महिलांनी त्याच्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिले आहेत. त्यानुसार संपत राम याच्याविरोधात विनयभंगाचे आणखी दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. वाकड पोलिसांच्यावतीने सहायक सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी जामिनास विरोध केला. प्रथम न्यायदंडाधिकारी एम. पी. परदेशी यांनी त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.