डीएसकेच्या पुतणीला जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:13 AM2021-02-24T04:13:25+5:302021-02-24T04:13:25+5:30
पुणे : ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणात डीएसके यांची पुतणी सई वांजपे हिला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ...
पुणे : ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणात डीएसके यांची पुतणी सई वांजपे हिला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी हे गुंतवणुकदाराची फसवणूक केल्याप्रकरणात गेल्या ३ वर्षांपासून तुरुंगात आहेत. याप्रकरणात त्यांची पुतणी सई वांजपे हीही २०१८ पासून तुरुंगात असून त्यांचे जामीन सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाने फेटाळले होते.
सई वांजपे यांच्या वतीने ॲड. अनिकेत निकम यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला की फुरसुंगी जागेचे सर्व व्यवहार हे सई वांजपे यांना पहाता सहआरोपी बघत होते व त्या जागेच्या खरेदी विक्री संदर्भातील कुठलेही धनादेशावर सई वांजपे यांनी सही केली नाही. विशेष सरकारी वकील चव्हाण यांनी सई वांजपे यांना जामीन देऊ नये व सकृतदर्शनी त्यांच्या विरोधात गुन्हा सिद्ध होतो, अशा स्वरूपाचा युक्तिवाद करत जामीन देण्यास हरकत घेतली. उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर सई वांजपे यांचा जामिनाचा अर्ज मंजूर केला.