गुंतवणुकदारांची सव्वा दोन कोटींची फसवणूक करणाऱ्याचा जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:14 AM2021-03-09T04:14:32+5:302021-03-09T04:14:32+5:30

धनंजय जगन्नाथ जंगम (वय २६, रा. सदाशिव पेठ) असे जामीन फेटाळलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सचिन शंकर सल्ले ...

The bail of the fraudster of Rs 2.5 crore was rejected | गुंतवणुकदारांची सव्वा दोन कोटींची फसवणूक करणाऱ्याचा जामीन फेटाळला

गुंतवणुकदारांची सव्वा दोन कोटींची फसवणूक करणाऱ्याचा जामीन फेटाळला

Next

धनंजय जगन्नाथ जंगम (वय २६, रा. सदाशिव पेठ) असे जामीन फेटाळलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सचिन शंकर सल्ले (वय ३७, रा. बोपोडी) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जंगम याची व्हेस्टिरीका असोेसिएटस ॲण्ड मंगलमय इन्व्हेस्टमेंट नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास त्यावर सात टक्के व्याज व गुंतवणूक केलेले पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवून त्यातून मिळणारा लाभ सरळ आनलाइन पद्धतीने बँक खात्यात जमा होईल, असे आमिष त्याने फिर्यादी व इतर २५ व्यक्तींना दाखवले व फसवणूक केली, अशी फिर्याद देण्यात आली आहे. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी जंगम याला अटक करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी केला.

Web Title: The bail of the fraudster of Rs 2.5 crore was rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.