बनावट कंपन्यांद्वारे १२६ कोटी रुपयांचा जीएसटी बुडविल्याप्रकरणी दोघांना जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:14 AM2021-08-15T04:14:25+5:302021-08-15T04:14:25+5:30
पुणे : खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनावट कंपन्या स्थापन करून १२६ कोटी रुपयांचा जीएसटी बुडविल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ...
पुणे : खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनावट कंपन्या स्थापन करून १२६ कोटी रुपयांचा जीएसटी बुडविल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांना २० लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर कोर्टाने जामीन मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. यावलकर यांनी हा आदेश दिला. आरोपींनी पुराव्यात छेडछाड करू नये, कोर्टाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाऊ नये, तपास अधिकाऱ्यांकडे पासपोर्ट जमा करावा, तपास अधिकारी बोलावतील तेव्हा हजर राहावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
विदीत गर्ग, शिवम गर्ग अशी जामीन मंजूर झालेल्यांची नावे आहेत. आरोपीवर जीएसटी कायदा २०१७ चे कलम १३२ (१) (बी), १३२(१) (सी), भा. द. वि. कलम ४७१, १२० ब नुसार जीएसटीच्या पुणे विभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून आरोपीतर्फे अँड. अमोल डांगे, ॲड. महेश बडे, ॲड. अमेय गोऱ्हे यांनी कोर्टात अर्ज दाखल केला होता. जीएसटी डिपार्टमेंटने कुठलीही चौकशी न करता आरोपींना अटक केली. आरोपींना अटक करण्यापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयाने आरोपींना अटक करण्यापूर्वी पालन करावयाच्या आदेशाचा अवमान केला आहे. अटक आरोपीविरुद्ध इंदोर येथे देखील कायद्यानुसार तपास सुरू असताना कारवाई करण्यात आली होती. मात्रए जीएसटीच्या पुणे विभागाने अटक आरोपींवर अचानक कारवाई केली. त्या अनुषंगाने कोर्टाने सर्व मुद्दे गृहीत धरून आरोपींना जामीन द्यावा, असा युक्तिवाद ॲड. डांगे यांनी केला. न्यायालयाने युक्तिवाद मान्य करीत दोघांना जामीन मंजूर केला.
--------------------