महिला डॉक्टरांच्या स्नानगृहात स्पाय कॅमेरा लावणाऱ्या डॉक्टरला जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:09 AM2021-07-17T04:09:14+5:302021-07-17T04:09:14+5:30

पुणे : भारती विद्यापीठ परिसरातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या स्नानगृह आणि शयनकक्षात स्पाय कॅमेरा लावणाऱ्या सुजित आबाजीराव जगताप ...

Bail granted to doctor who installs spy camera in female doctor's bathroom | महिला डॉक्टरांच्या स्नानगृहात स्पाय कॅमेरा लावणाऱ्या डॉक्टरला जामीन मंजूर

महिला डॉक्टरांच्या स्नानगृहात स्पाय कॅमेरा लावणाऱ्या डॉक्टरला जामीन मंजूर

Next

पुणे : भारती विद्यापीठ परिसरातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या स्नानगृह आणि शयनकक्षात स्पाय कॅमेरा लावणाऱ्या सुजित आबाजीराव जगताप या डॉक्टरला ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला.

डॉक्टरविरुद्ध भारतीय दंडविधान कलम ४४३, ३५४ क, आयटी अ‍ॅक्ट ६६ इ व ६७ या अंतर्गत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. आरोपीला जर जामिनावर सोडले, तर तो तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न करेल. तसेच एका हॉस्पिटलमध्ये काम करीत असल्याने तो तक्रारदाराला धमकावण्याची शक्यता आहे. त्याला दिलेल्या स्वातंत्र्याचा तो गैरफायदा देखील घेऊ शकतो. त्यामुळे आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर करावा, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. मात्र, आरोपीच्या वकिलांनी सांगितले की, ज्या कलमान्वये आरोपींवर दोषारोप आहेत, तो गुन्हा जामीनपात्र आहे. गुणदोषानुसार खटल्याच्या निकालात बराच कालावधी लागणे शक्य आहे. आरोपीला जामिनावर न सोडल्यास त्याच्या रोजगार धंद्याचे नुकसान होईल. कलम ४४३ व वगळता बाकी सर्व कलम जामीनपात्र असून, कलम ४४३ ला दोन वर्षांची शिक्षा आहे. आरोपी हा पुण्याचा कायमस्वरूपी रहिवासी असून, तो फरार होणार नाही. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला. आरोपीच्या बाजूने अ‍ॅड. सुधीर शाह, अ‍ॅड. सारथी पानसरे, अ‍ॅड. तेजलक्ष्मी धोपावकर आणि अ‍ॅड. सूरज इंगले यांनी काम पाहिले.

---------------------

काय आहे प्रकरण?

सुजित आबाजीराव जगताप हा मेंदूविकारतज्ज्ञ आहे. भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये तो लेक्चरर आहे. त्यातून त्याची महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरांशी चांगली ओळख झाली. त्याने त्यांच्याशी बोलताना नकळतपणे त्यांच्या खोलीच्या चावीचे ठसे घेतले. त्याने त्यांच्या खोलीची बनावट चावी तयार करून घेतली. महिला डॉक्टर हॉस्पिटल असल्याचे पाहून त्याने बनावट चावीद्वारे खोली उघडून त्यांच्या स्नानगृह व शयनकक्षात कॅमेरा असलेले बल्ब लावले होते. महिला डॉक्टरांच्या वेळीच हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली होती.

--------------------------------------------------

Web Title: Bail granted to doctor who installs spy camera in female doctor's bathroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.