अवैधरीत्या कासव तस्करी करणाऱ्यांना जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:08 AM2021-07-12T04:08:55+5:302021-07-12T04:08:55+5:30
पुणे : अवैधरीत्या कासव तस्करी करणाऱ्या दोघांना पिंपरी येथील मोरवाडी न्यायालयाने जामीन मंजूर केला. वन विभागाने पिंपरीच्या मैत्री चौक ...
पुणे : अवैधरीत्या कासव तस्करी करणाऱ्या दोघांना पिंपरी येथील मोरवाडी न्यायालयाने जामीन मंजूर केला. वन विभागाने पिंपरीच्या मैत्री चौक तुकारामनगर येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून अवैधरीत्या कासव खरेदी विक्री व्यवहार चालू असताना दोघांना ताब्यात घेतले. या आरोपींना दखलपात्र गुन्ह्यात अटक करण्यात आली. २९ आॅक्टोबर २०२० मध्ये हा प्रकार घडला होता.
अथर्व शशिकांत देशमुख आणि श्रीकृष्ण अवधूत वंजारी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. महिला वन अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी अथर्व देशमुखच्या राहत्या घराची तपासणी केली असता एका छोट्याशा बॉक्समध्ये दोन कासवे मृत अवस्थेत व एक कासव जिवंत अवस्थेत आढळून आले. त्यातील एक कासव हे इंडियन जम टेंट टर्रल व दोन कासवे इंडियन रूफ टर्रल या दुर्मिळ प्रजातीची आहेत. आरोपींना पिंपरी येथील मोरवाडी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना दि. ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. त्याच दिवशी आरोपीच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला. त्यांनी युक्तिवाद करून दोन्ही आरोपींना जामीन मिळवून दिला. आरोपींच्या वतीने अॅड. चैतन्य दीक्षित, अॅड. कपिल काळे आणि ओंकार देसाई यांनी कामकाज पाहिले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------