साक्षीदाराने ओळखल्याने खून प्रकरणातील जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:20 AM2021-09-02T04:20:08+5:302021-09-02T04:20:08+5:30

पुणे : कारला साईड न दिल्याने बेकायदा जमाव जमवून लाकडी दांडके आणि दगडाने डोक्यात मारहाण करून एकाचा खून करण्यात ...

Bail in the murder case was denied after the witness was identified | साक्षीदाराने ओळखल्याने खून प्रकरणातील जामीन फेटाळला

साक्षीदाराने ओळखल्याने खून प्रकरणातील जामीन फेटाळला

googlenewsNext

पुणे : कारला साईड न दिल्याने बेकायदा जमाव जमवून लाकडी दांडके आणि दगडाने डोक्यात मारहाण करून एकाचा खून करण्यात आला. ही घटना रेल्वे गेटजवळ झाली आहे. त्या वेळी रेल्वे येणार असल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून भांडणे सोडविली. त्यांचा जबाब देखील नोंदविण्यात आला आहे. आरोपीला साक्षीदाराने ओळख परेडमध्ये ओळखले असल्याने त्याचा जामीन फेटाळण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. ती ग्राह्य धरीत आरोपीचा जामीन सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी फेटाळला.

दगडू ऊर्फ सुभाष अशोक सांडभोर (वय ३०, रा. नागाथळी, ता. मावळ) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर आणखी तिघांवर गुन्हा दाखल आहे. शुभम विलास डोंगरे (वय २७, रा. जांभुळ, ता. मावळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याचा भाऊ प्रशांत (वय २४) हा घटनेत जखमी झाला आहे. त्यांच्या आईने वडगाव मावळ पोलिसांत याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना २० जानेवारी २०२१ रोजी मावळ तालुक्यातील जांभूळ गावच्या हद्दीत घडली.

फिर्यादींच्या दोन्ही मुलांना मारहाण करण्यात आली होती. त्यामध्ये शुभम याचा मृत्यू झाला आहे. सुनील शिंदे याच्या कारला साईड न दिल्याने ही मारहाण करण्यात आली. त्यापैकी दगडू याने दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर जामिनासाठी अर्ज केला. यास अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार आगरवाल यांनी विरोध केला. या गुन्ह्यात आणखी तिघांना अटक करण्यात आलेली नाही. तो घटनास्थळी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्याची मागणी ॲॅड. आगरवाल यांनी केली. ती मान्य झाली.

Web Title: Bail in the murder case was denied after the witness was identified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.