मोक्काची कारवाई झालेला कुख्यात गुंड बंडू आंदेकरसह सहा जणांना जामीन

By नम्रता फडणीस | Published: January 5, 2024 11:10 AM2024-01-05T11:10:14+5:302024-01-05T11:10:33+5:30

पोलिसांनी ९० दिवसांमध्ये दोषारोपपत्र दाखल करणे आवश्यक होते...

Bail to six persons including notorious gangster Bandu Andekar pune crime | मोक्काची कारवाई झालेला कुख्यात गुंड बंडू आंदेकरसह सहा जणांना जामीन

मोक्काची कारवाई झालेला कुख्यात गुंड बंडू आंदेकरसह सहा जणांना जामीन

पुणे : खून आणि नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोक्काची कारवाई केलेल्या कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्यासह सहा जणांना विशेष जिल्हा न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी जामीन मंजूर केला आहे.

सूर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर, कृष्णराज ऊर्फ कृष्णा सूर्यकांत आंदेकर, तुषार निलंजय वाडेकर, स्वराज ऊर्फ शक्ती निलंजय वाडेकर, पुराराम ऊर्फ रामाराम दीपाराम गुज्जर आणि आकाश ऊर्फ पैलवान रामदास खरात अशी जामीन मंजूर झालेल्यांची नावे आहेत. समर्थ पोलिसांनी दि. ३ ऑक्टोबर रोजी निखिल सखाराम आखाडे यांचा खून केलेल्या आरोपासह अनिकेत ज्ञानेश्वर दूधभाते यांचा खून करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात वरील आराेपींना अटक केली होती. अप्पर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी मोक्का कायद्याचे कलम लावण्याची मान्यता दिली होती. त्यानुसार समर्थ पोलिसांनी दि. २८ डिसेंबर रोजी आरोपींवर मोक्काची कारवाई केली. ॲड. बिलाल शेख यांनी आरोपींतर्फे जामीन अर्ज दाखल केला.

पोलिसांनी ९० दिवसांमध्ये दोषारोपपत्र दाखल करणे आवश्यक होते. अथवा मोक्का कलम २१ नुसार दोषारोपपत्र दाखल करण्यास मुदत घेणे आवश्यक होते. परंतु पोलिसांनी दोन्ही गोष्टी केल्या नाहीत, असा युक्तिवाद ॲड. शेख यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून पोलिसांनी आरोपींना जामीन मंजूर केला.

Web Title: Bail to six persons including notorious gangster Bandu Andekar pune crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.