आशा वर्कर्सना मिळणार सायकलींची साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 12:26 AM2019-02-22T00:26:19+5:302019-02-22T00:27:06+5:30

खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते वाटप : वयोश्री योजनेच्या लाभार्थ्यांना साहित्य

Baiyakshini will get the hope | आशा वर्कर्सना मिळणार सायकलींची साथ

आशा वर्कर्सना मिळणार सायकलींची साथ

Next

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील आशा वर्कर्स यांना पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने एकूण १५०० सायकली मोफत वाटप करण्यात येणार असून, प्रथम टप्प्यात त्यातील एकूण २८० सायकलींचे वाटप गुरुवार रोजी दुपारी ३ वाजता खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

इंदापूर शहरातील विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या मैदानात सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी बारामती येथे वयोश्री योजनेअंतर्गत पूर्व तपासणी झालेल्या, इंदापूर तालुक्यातील गरजवंत अपंग लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी अपंग लाभार्थी व आशा वर्कर्स यांच्या बरोबर गप्पा मारल्या व त्यांची विचारपूस केली. आशा वर्कर्स यांना सायकलीवर बसवून त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे यांनीदेखील सायकल चालवली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, ज्येष्ठ नेते अशोक घोगरे, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, वैशालीताई पाटील, कृषी उत्पन्न बाजर समिती उपसभापती यशवंत माने, राष्ट्रवादी इंदापूर शहराध्यक्ष अनिल राऊत, नगरसेवक श्रीधर बाब्रस, नगरसेविका हेमलता माळुंजकर, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अरबाज शेख, सामाजिक कार्यकर्ते अशोक मखरे, वसंतराव माळुंजकर, अशोक चोरमले, विद्या प्रतिष्ठानचे व्यवस्थापक वर्धमान शहा आदी मान्यवर मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
 

Web Title: Baiyakshini will get the hope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.