‘बाजीराव-मस्तानी’ला विरोधाचा फार्स; पोलीस बंदोबस्त

By admin | Published: December 19, 2015 03:17 AM2015-12-19T03:17:23+5:302015-12-19T03:17:23+5:30

‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटात थोरले बाजीराव पेशवे व त्यांच्या कुटुंबीयांचे विकृत चित्रीकरण केल्याचा आक्षेप घेऊन भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पुण्यातील काही

'Bajirao-Mastani' to fight against corruption; Police settlement | ‘बाजीराव-मस्तानी’ला विरोधाचा फार्स; पोलीस बंदोबस्त

‘बाजीराव-मस्तानी’ला विरोधाचा फार्स; पोलीस बंदोबस्त

Next

पुणे : ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटात थोरले बाजीराव पेशवे व त्यांच्या कुटुंबीयांचे विकृत चित्रीकरण केल्याचा आक्षेप घेऊन भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पुण्यातील काही चित्रपटगृहांसमोर आंदोलन केले. त्यामुळे, काही चित्रपटगृहचालकांना ‘शो’ बंद करावे लागले. परिणामी, पोलीस बंदोबस्त ठेवून चित्रपट प्रदर्शित करावा लागला. मात्र, आंदोलकांनी चित्रपटगृहासमोर लावलेले पोस्टर फाडून आंदोलन केले.
भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध करून, आंदोलनाचा इशारा दिला होता. तरीही कोथरूडमधील सिटी प्राइड चित्रपटगृहात तिकिटांची विक्री करण्यात आली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच चित्रपटगृहासमोर आंदोलन करून निषेध व्यक्त केला. चित्रपटगृहाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे सिटी प्राइड, कोथरूडमधील शो रद्द करण्यात आले. मंगला चित्रपटगृहासमोरही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून पोस्टर फाडले. बंदोबस्तात चित्रपटाचा शो प्रदर्शित करण्यात आला.
युवा मोर्चा कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष रितेश वैद्य म्हणाले की, या चित्रपटामुळे मराठ्यांच्या इतिहासाचे विकृत प्रदर्शन होत असतानाच श्रद्धास्थानांची बदनामी होत असल्याची भावना वाढीस लागत आहे. त्यामुळे सिटी प्राइडचे सर्व शो बंद पाडण्यात आले. दरम्यान, आमदार मेधा कुलकर्णी यांनी चित्रपटास विरोध नाही; पण इतिहासाचे चुकीचे चित्रीकरण वगळून मग चित्रपट प्रसिद्ध करावा, असे पत्र मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्र्यांना दिले होते. वैद्य यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात मतदारसंघाचे अध्यक्ष जगन्नाथ कुलकर्णी, सरचिटणीस अमोल डांगे, कुलदीप सावळेकर, प्रकाश बालवडकर, शहर उपाध्यक्ष जयंत भावे, डॉ. संदीप बुटाला, चिटणीस प्रशांत हरसुले, नगरसेविका मोनिका मोहळ, मंदार घाटे, उदय कड, सुनील मेंगडे, सचिन फोलाने, अजय मारणे, अशोक शेलार आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, सिटी प्राइड कोथरूड येथे सकाळी सात वाजल्यापासून
पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला
होता. पाच अधिकारी व २९ कर्मचारी, असा मोठा फौजफाटा चित्रपटगृहाच्या बाहेर होता, असे कोथरूड पोलिसांनी सांगितले.तर मंगला चित्रपट गृहासमोर सकाळी नऊ वाजल्यापासून पोलीस बंदोबस्त होता.

पुणे भाजपाने चित्रपटाचे शो रद्द करावेत, असे निवेदन दिले होते. त्यामुळे शुक्रवारी मल्टिप्लेक्समधले एकूण १० शो रद्द करण्यात आले. मात्र, उद्या (शनिवारी) एकही शो रद्द करण्यात येणार नाही. बुकिंग करूनही जे शुक्रवारी चित्रपट पाहू शकलेले नाहीत, त्यांना उद्या हा शो पाहता येणार आहे.
- पुष्कराज चाफळकर,
मालक सिटी प्राइड, मल्टिप्लेक्स

आंदोलनाशी आमचा संबंध नाही
शहरामध्ये चित्रपटाविरोधात हिंसक मार्गांनी झालेल्या आंदोलनाशी आमचा काहीही संबंध नाही. आमचे नाव यामध्ये विनाकारण गोवले जात आहे. गाण्यांच्या माध्यमातून इतिहासाच्या होणाऱ्या विकृतीकरणाला आमचा विरोध आहे. यातील गाणी वगळण्यात यावी, ही आमची मागणी आहे. प्रेक्षकांनी हा चित्रपट इतिहास म्हणून न पाहता मनोरंजन म्हणून पाहावे.
- पुष्करसिंह पेशवा,
पेशव्यांचे वंशज

Web Title: 'Bajirao-Mastani' to fight against corruption; Police settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.