राजेंद्र निंभोरकर यांना बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 02:14 AM2018-08-14T02:14:21+5:302018-08-14T02:14:45+5:30
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३१८व्या जयंतीनिमित्त थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
पुणे : श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३१८व्या जयंतीनिमित्त थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
शनिवारी (दि. १८ आॅगस्ट) सायंकाळी ५.३० वाजता टिळक स्मारक मंदिर येथे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येईल.
या वेळी राजेंद्र निंभोरकर हे ‘सर्जिकल स्ट्राईक’ या विषयावर बोलणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे यांनी दिली.
सन्मानचिन्ह, पेशवाई पगडी, २५ हजार रुपये रोख, शाल व श्रीफल, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.