बाजीरावांचे मध्य प्रदेशातील स्मारक मराठा स्थापत्यशैलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:13 AM2021-08-24T04:13:56+5:302021-08-24T04:13:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: मध्य प्रदेशात नर्मदातिरी रावेरखेडी येथे होणारे थोरल्या बाजीरावांचे स्मारक मराठा स्थापत्यशैलीत व्हावे, ही मराठी इतिहासकारांची ...

Bajirao's monument in Madhya Pradesh in Maratha architectural style | बाजीरावांचे मध्य प्रदेशातील स्मारक मराठा स्थापत्यशैलीत

बाजीरावांचे मध्य प्रदेशातील स्मारक मराठा स्थापत्यशैलीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: मध्य प्रदेशात नर्मदातिरी रावेरखेडी येथे होणारे थोरल्या बाजीरावांचे स्मारक मराठा स्थापत्यशैलीत व्हावे, ही मराठी इतिहासकारांची मागणी मध्य प्रदेश सरकारने मान्य केली. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी तशा सूचना जाहीर कार्यक्रमातच मध्य प्रदेश सांस्कृतिक विभागाला दिल्या.

अखेरपर्यत अजिंक्य बाजीरावांनी आपला देह मध्य प्रदेशात रावेरखेडला ठेवला. राजा छत्रसाल यांच्या मदतीला बुंदेलखंडात धाव घेऊन निर्माण केलेले नाते बाजीरावांनी दृढ केले. त्याची जाण ठेवत मध्य प्रदेश सरकारने रावेरखेडला १०० कोटी रुपयांचा बाजीराव समाधी जीर्णोद्धार प्रकल्प जाहीर केला. त्याची शैली थोडी मोगलकालीन स्थापत्यशैलीतील होती. इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी याला हरकत घेत हे स्मारक मराठा स्थापत्यशैलीत व काळ्या पाषाणात व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

त्याला मान्यता देत मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक विभागाने लगेचच पूर्वीचा विकास आराखडा बदलून नवा तयार केला. हा आराखडा १०० कोटी रुपयांचा आहे. त्यातील २७ कोटींच्या कामाचे भूमिपूजन १८ ऑगस्टला बाजीरावांच्या जयंतीदिनी झाले. या स्मारकात आता काळ्या पाषाणातील शनिवारवाड्याच्या दिल्ली दरवाजाची बुरुजांसहितची प्रतिकृती असेल. बाजीराव पेशव्यांचा एक भव्य पुतळा, भव्य घाट, बाजीरावांच्या पत्नी काशीबाई यांनी बांधलेल्या शिवमंदिराचा जीर्णोद्धार, भव्य संग्रहालय, पर्यटन निवास, व्यापारी संकुल, समाधिस्थळाकडे जाण्यासाठी चौपदरी रस्ता निर्माण करण्यात येणार आहे.

माळवा-बुंदेलखंडची जनता बाजीरावांचे ऋण कदापि विसरणार नाही, असे या वेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर, खासदार गजेंद्र चौहान, होळकर घराण्याचे वंशज यशवंतराव होळकर, बाजीराव-मस्तानीचे वंशज अवेश बहाद्दूर, पुण्यातून इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, बाजीराव स्मारक समितीचे सचिव श्रीपाद कुलकर्णी, श्रीनिवास कुलकर्णी उपस्थित होते.

Web Title: Bajirao's monument in Madhya Pradesh in Maratha architectural style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.