बकरी ईदनिमित्त नमाज

By admin | Published: September 26, 2015 01:46 AM2015-09-26T01:46:18+5:302015-09-26T01:46:18+5:30

येथील जामा मस्जीद येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मुस्लीम बांधवांनी शुक्रवारी सकाळी बकरी ईद उत्साहात साजरी केली

Bakery Eidimitit Namaz | बकरी ईदनिमित्त नमाज

बकरी ईदनिमित्त नमाज

Next

वडगाव मावळ : येथील जामा मस्जीद येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मुस्लीम बांधवांनी शुक्रवारी सकाळी बकरी ईद उत्साहात साजरी केली.
हजारो मुस्लीम बांधवांनी सार्वजनिक नमाज पठण केले. मुजीम मौलाना व रहमद मौलाना यांनी धार्मिक विषयावर प्रवचन दिले. सौदी अरब येथील मक्का पवित्र तीर्थस्थळाजवळ चेंगराचेंगरीत मृत्युुमुखी पडलेल्या मुस्लीम बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना पाच हजार रुपये दुष्काळ निधी जमा करण्यात आला.
मुस्लीम बांधवांनी ईदनिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या. वडगाव पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी चोख बंदोबस्त केल्याने त्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. गरिबांना दान देण्यात आले. अब्दुल शेख, हाजी इब्राहिम शेख, रशीद शेख, मोमीन मोजीबुर शेख, अस्लम मोमीन, सलीम तांबोळी, शफी मोमीन, जाकीर शेख, लतीफ नदाफ व मुस्लीम बांधव उपस्थित होते.
किवळे : देहूरोड, किवळे, विकासनगर, रावेत व गहुंजे परिसरातील मुस्लीम बांधवांनी शुक्रवारी बकरी ईद साजरी केली. देहूरोड, विकासनगर, रावेत व गहुंजे येथील मशिदीमध्ये मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन नमाज पठण केले.
बकरी ईद हा त्याग व बलिदानाचा दिवस मानला जातो. त्या निमित्ताने बोकडाची कुर्बानी देण्यात आली. अन्य धर्मीयांनी मुस्लीम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. परिसरातील शुक्रवारी विविध शाळा, सरकारी कार्यालये बकरी ईदनिमित्त बंद होती. या वेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर )

Web Title: Bakery Eidimitit Namaz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.