संतुलनचे काम चंदनासारखे : मानखेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:10 AM2021-01-14T04:10:15+5:302021-01-14T04:10:15+5:30
पुणे : स्वत: झीज सोसून दुसऱ्याला मदत करणे ही भारतीय संस्कृती आहे. संतुलन संस्था हे चंदनासारखे काम करत आहे, ...
पुणे : स्वत: झीज सोसून दुसऱ्याला मदत करणे ही भारतीय संस्कृती आहे. संतुलन संस्था हे चंदनासारखे काम करत आहे, असे प्रतिपादन यशवंत मानखेडकर यांनी केले. संतुलन संस्थेच्या वतीने राष्ट्रीय युवा दिनानिमित्त दगडखाण क्षेत्रातील युवकांची युवा परिषद घेण्यात आली. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला. रामेश्वर कारके, अश्विनी पात्रे, मंगल पवार, कुमार अवसरेकर, ज्ञानेश्वर तांबे, विवेक लष्करे, दीपक धोत्रे, हिरामण सातपुते, जॉन फर्नांडिस, सावळाराम जाधव यांना संतुलन पुरस्कार दिले. कार्यक्रमाला शनिभाऊ शिनगारे, वंदना भुजबळ, ए. एम. भट्ट उपस्थित होते. संतुलन संस्थेचे संस्थापक अॅड. बी. एम. रेगे यांनी स्वागत केले. पल्लवी रेगे यांनी प्रास्तविक तर आदिनाथ चांदणे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश पवार यांनी संयोजन केले.