हवेली पंचायत समिती सभापतिपदी बाळासाहेब मोकाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:12 AM2021-09-22T04:12:30+5:302021-09-22T04:12:30+5:30
हवेली पंचायत समितीचे सभापती पद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. परंतु पुणे महापालिकेची हद्दवाढ होऊनही ग्रामीण क्षेत्रातील गावांचा ...
हवेली पंचायत समितीचे सभापती पद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. परंतु पुणे महापालिकेची हद्दवाढ होऊनही ग्रामीण क्षेत्रातील गावांचा समावेश महापालिकेत झाल्याने या गावांमधील सदस्यांचे सदस्यत्व संपुष्टात आले होते. त्यामुळे राखीव प्रवर्गातील सदस्य सध्या अस्तित्वात नाहीत. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या उपसभापतीकडे सभापती पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे.
हवेलीतील सभापती आणि उपसभापती ही दोन्ही पदे रिक्त असल्याने प्रभारी सभापती म्हणून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती पूजा पारगे यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु गेल्याच आठवड्यात उपसभापती पदाची निवडणूक करून बाळासाहेब मोकाशी हे उपस्थित झाले. त्यामुळे त्यांच्याकडे आता सभापतिपदाचा पदभार सोपवण्यात आला. हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, शहरप्रमुख गजानन थरकुडे, रमेश कोंडे, शामराव मोरे, भरत कुंभारकर, महेश मते, नारायण ओव्हाळ, सचिन घुले, प्रशांत काळभोर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.