बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नातील महाराष्ट्र साकार होण्यासाठी सर्वांना ताकद दे- आ. डॉ. नीलम गोऱ्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2017 06:40 PM2017-09-05T18:40:09+5:302017-09-05T18:40:20+5:30
“महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् व्हावा, जनतेला कोणताही त्रास होऊ नये, राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबाव्यात, महिला–मुली व सामान्य नागरिक यांना सुरक्षितता मिळावी याकरिता श्रीगणेशाच्या चरणी प्रार्थना केली आहे.
पुणे, दि. 5 - “महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् व्हावा, जनतेला कोणताही त्रास होऊ नये, राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबाव्यात, महिला–मुली व सामान्य नागरिक यांना सुरक्षितता मिळावी याकरिता श्रीगणेशाच्या चरणी प्रार्थना केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वतीने राज्यातील सर्व गणेशभक्तांना त्यांची सर्व सुखस्वप्ने साकार होवोत अशा शुभेच्छा दिल्या. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र साकार होण्यासाठी सर्वाना ताकद मिळावी,” अशी प्रार्थना आज शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्रींच्या चरणी केली. त्या आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.
पुण्याचे ग्रामदैवत श्रीकसबा गणपतीला आज विसर्जन मिरवणुकीत शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण केला व श्रींचे दर्शन घेतले. श्रीगणेशाला वंदन करून त्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी पुणे शहराचे पोलीस सहआयुक्त डॉ. बसवराज तेली, उपायुक्त रवींद्र सेनगावकर यांच्याशी अनौपचारिक चर्चा केली. आ. डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते आज तुळशीबाग परिसरातील गजानन मित्रमंडळाच्या गणपतीची आरती केली. या वेळच्या मिरवणुकीत पुण्यातील छोटा गणेशभक्त ऋतुराज कालेकर बाहुबलीच्या रूपात आज शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासोबत सहभागी झाला. पारंपरिक वेशभूषा करून मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिलावर्गालाही शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुभेच्छा दिल्या.
विधान परिषदेतील व काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त ताईनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट उपस्थित होते. विसर्जन मिरवणुकीच्या वेळी समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, माजी खासदार सुरेश कलमाडी, आमदार माधुरी मिसाळ, आमदार शरद रणपिसे, उल्हासदादा पवार, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, माजी महापौर अंकुश काकडे, विश्वजीत कदम, सतीश देसाई, वीरेंद्र किराड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासोबत शिवसेनेच्या वतीने मा. उपशहर प्रमुख राजेंद्र शिंदे, नगरसेविका पल्लवी जावळे, राजू विटकर, युवराज शिंगाडे, एकनाथ ढोले, शादाब मुलाणी, स्त्री आधार केंद्राचे शेलार गुरुजी, योगेश शेलार, गणेश मंडळाचे अध्यक्ष सागर दुधभाते व मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.