पुण्यातील ‘बालरंजन’ने सादर केलेल्या श्यामची आई बालनाट्यास कांकरिया करंडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 05:08 PM2017-12-26T17:08:34+5:302017-12-26T17:15:08+5:30

भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्राने, नगर येथील कांकरिया करंडकावर आपले नाव कोरले. राज्यस्तरीय कांकरिया करंडक स्पर्धेत बालरंजन केंद्राने 'श्यामची आई' हे देवेंद्र भिडे लिखित बालनाट्य सादर केले होते.

Balranjan's shyamchi aai won kankariya karandak in Pune | पुण्यातील ‘बालरंजन’ने सादर केलेल्या श्यामची आई बालनाट्यास कांकरिया करंडक

पुण्यातील ‘बालरंजन’ने सादर केलेल्या श्यामची आई बालनाट्यास कांकरिया करंडक

googlenewsNext
ठळक मुद्देबालरंजन केंद्राने सादर केले होते 'श्यामची आई' हे देवेंद्र भिडे लिखित बालनाट्ययंदा साने गुरुजींची आई यशोदा साने यांचे जन्मशताब्दी वर्ष, त्यामुळे नाटकाची निवड

पुणे : पुण्यातील भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्राने, नगर येथील कांकरिया करंडकावर आपले नाव कोरले. राज्यस्तरीय कांकरिया करंडक स्पर्धेत बालरंजन केंद्राने 'श्यामची आई' हे देवेंद्र भिडे लिखित बालनाट्य सादर केले होते. त्यावर परीक्षकांनी आपल्या पसंतीची मोहोर उमटविली आणि हे नाटक करंडकाचे मानकरी ठरले.
बालरंजन केंद्राच्या संस्थापक संचालिका माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या, बालरंजनचे तिसावे वर्ष आता संपत आले आहे. अशावेळी मिळालेले हे बक्षीस आनंददायी आहे. गेली पंधरा वर्षे आम्ही या स्पर्धेत भाग घेतो. त्यात अनेक पारितोषिके पटकाविली. तसेच हा मानाचा करंडक तिसऱ्यांदा मिळविला आहे. यंदा साने गुरुजींची आई यशोदा साने यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे श्यामची आई नाटकाची निवड केली. मुलांच्या सुंदर अभिनयाने ती निवड सार्थ ठरली.


दिग्दर्शनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देवेंद्र भिडे यांना मिळाले. अभिनय स्त्री प्रथम पुरस्कार श्यामच्या आईची भूमिका अप्रतिम वठविणाऱ्या रेवती देशपांडेने पटकाविला. नेपथ्याचा प्रथम क्रमांकही बालरंजन ने मिळविला. कांकरिया करंडकासह चार पुरस्काराने बालरंजन केंद्राचे श्यामची आई सन्मानित झाले. उत्तम टीमवर्कचे प्रदर्शन करीत नाटक प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरले. रेणुका भिडे यांचे पार्श्वसंगीत व प्रकाशयोजना या बाबीही उल्लेखनीय होत्या.

Web Title: Balranjan's shyamchi aai won kankariya karandak in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे