बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन लोणावळ्यात, अध्यक्षपदी डॉ. अनिल अवचट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 05:06 AM2017-09-17T05:06:21+5:302017-09-17T05:06:26+5:30

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलनाचे लोणावळा येथे आयोजन करण्यात आले आहे.

Balumar Sahitya Sammelan organized in Lonavla, presided over by Dr. Anil Avchat | बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन लोणावळ्यात, अध्यक्षपदी डॉ. अनिल अवचट 

बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन लोणावळ्यात, अध्यक्षपदी डॉ. अनिल अवचट 

googlenewsNext

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलनाचे लोणावळा येथे आयोजन करण्यात आले आहे. २० सप्टेंबरला होणा-या या संमेलनाचे अध्यक्षस्थान बालकुमारांसाठीच्या लेखनाबद्दल साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित झालेले ज्येष्ठ साहिमत्यिक डॉ. अनिल अवचट भूषविणार आहेत.
या संमेलनाला परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आणि मसापचे पदाधिकारी तसेच मनशक्ती प्रयोग केंद्राचे विश्वस्त प्रमोदभाई शिंदे, कार्यकारी विश्वस्त प्रल्हाद बापर्डेकर, संशोधन विभागप्रमुख व विश्वस्त गजानन केळकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
प्रा. जोशी म्हणाले, ‘‘मराठी अभिमान गीत शालेय विद्यार्थी सादर करणार असून उद्घाटन सत्रात संमेलनाध्यक्ष डॉ. अनिल अवचट बालकुमारांशी संवाद साधणार आहेत. ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या बालकवितांवर आधारित विशेष कार्यक्रम लेखक राजीव तांबे सादर करणार आहेत. कवयित्री डॉ. संगीता बर्वे, आश्लेषा महाजन आणि आदित्य दवणे ‘लेखनाची आनंद वाट’ या कार्यक्रमात बालकुमारांसाठी लेखन कार्यशाळा घेणार आहेत.
जोशी म्हणाले, उद्याच्या साहित्य संस्कृतीची पालखी ज्यांच्या खांद्यावर आहे, अशा बालकुमारांसाठीची साहित्य संमेलने बंद पडली आहेत. ही मुले साहित्य आणि संमेलनाच्या आनंदापासून वंचित राहू नयेत यासाठी जिल्हावार साधेपणाने एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलने घेण्याचा निर्णय मसापच्या कार्यकारिणीने घेतला. त्यानुसार मसापचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये ही संमेलने होणार आहेत.

‘आम्हालाही काही सांगायचंय’ या विशेष कार्यक्रमात अनेक बालकुमार त्यांनी लिहिलेल्या कथा, कविता आणि लेखांचे सादरीकरण करणार आहेत. समारोपाला पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून ते बालकुमारांशी संवाद साधणार आहेत.

Web Title: Balumar Sahitya Sammelan organized in Lonavla, presided over by Dr. Anil Avchat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.