बालेवाडी सीएम चषक : आमदारांनी टाकले नगरसेवकांना मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 01:46 AM2018-12-23T01:46:23+5:302018-12-23T01:46:40+5:30
राजकारणामध्ये एकमेकाला मागे टाकण्याची स्पर्धा नेहमी असते पण लोकप्रतिनिधींनी धावण्याच्या शर्यतीत एकमेकाला मागे टाकण्याचा आनंद घेतला.
पाषाण : राजकारणामध्ये एकमेकाला मागे टाकण्याची स्पर्धा नेहमी असते पण लोकप्रतिनिधींनी धावण्याच्या शर्यतीत एकमेकाला मागे टाकण्याचा आनंद घेतला. आमदार मेधा कुलकर्णी यांनी शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये नगरसेवकांना मागे टाकत बाजी मारली. बालेवाडी येथे सीएम चषक स्पर्धेदरम्यान लोकप्रतिनिधींचीही पळण्याची स्पर्धा झाली.
या स्पर्धेचे उद्घाटन आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेविका ज्योती गणेश कळमकर, नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर, नगरसेवक जयंत भावे, अध्यक्ष भाजपा कोथरूड मतदारसंघ प्रकाश बालवडकर, उपाध्यक्ष राहुल कोकाटे, गणेश कळमकर, सचिन पाषाणकर, कोथरूड युवा मोर्चा अध्यक्ष रितेश वैद्य, नवनाथ वावले यांनी १०० मीटर धावणे या स्पर्धेत सहभागी होऊन
उद्घाटन केले. यावेळी भाजपा पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
आॅनलाईन नोंदणीला प्रतिसाद
श्री छत्रपती शिवाजीमहाराज क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सीएम चषक स्पर्धा व खेलो इंडिया या स्पर्धेच्यानिमित्ताने आज १०० मीटर व ४०० मीटर धावणे या स्पर्धेचे आयोजन आमदार मेधा कुलकर्णी व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विद्यार्थी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आॅनलाईन नावनोंदणी करून आपला सहभाग नोंदविला होता.