तळजाई टेकडीवर पाच एकरमध्ये बांबूचे विशेष उद्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:02 PM2018-12-26T12:02:10+5:302018-12-26T12:09:24+5:30

दैनंदिन जीवनातील वापराच्या दृष्टीने बांबू हे बहुउपयोगी आहे. याची माहिती आणि ज्ञान पुढील पिढीला व्हावी हा यामागील उद्देश आहे...

Bamboo special garden at five acres on Taljai tekdi | तळजाई टेकडीवर पाच एकरमध्ये बांबूचे विशेष उद्यान

तळजाई टेकडीवर पाच एकरमध्ये बांबूचे विशेष उद्यान

Next
ठळक मुद्देजगभरात बांबूच्या सुमारे सतराशे प्रजाती सुमारे अडीच कोटी रुपयांचा खर्च असून या कामासाठी दोन ते अडीच वर्षे पहिल्या टप्प्यात साधारण २२ प्रजातींची रोपे खरेदीची प्रक्रिया सुरू

पुणे: तळजाई टेकडीवरील सुमारे पाच एकर जागेमध्ये लवकरच बांबूचे विशेष उद्यान उभारण्यात येणार आहे. बांबू वनस्पतीची बहुउपयोगीता पुढील पिढीला समजावी, हा उद्देश ठेवून हे उद्यान पुढील दोन वर्षांत बहरेल, असा विश्वास पुणे महापालिकेचे उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी दिली. 
    तळजाई टेकडी पुणे शहराला पर्यावरणदृष्टया वरदान ठरलेली आहे. वनविभागाच्या शेकडो एकर जागेमध्ये वनसंपदा टीकून असून ती वृद्धिंगत करण्यासाठी वनविभाग, महापालिका आणि पर्यावरण प्रेमी नागरिकांचे योगदान लाभले आहे. तसेच या टेकडीचा बराचसा भाग हा महापालिकेच्या ताब्यात असून महापालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पर्यावरण प्रेमींच्या मदतीने तिचे जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहे. ऑक्सिजन पार्क, स्मृतीवन अशा संकल्पना राबवून नवनवीन वृक्षराजींची त्यामध्ये भर घातली असून महापालिकेने याठिकाणी मोठ्याप्रमाणात सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. नुकतेच येथील पठारावर क्रिकेट स्टेडीयमसोबत ओपन जिम, जॉगींग ट्रॅकचीही निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये लवकरच एका बांबू उद्यानाची भर पडणार आहे.
    यासंदर्भात बोलताना उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी सांगितले, की कै. स.दू. शिंदे स्टेडीयमसमोरील पाच एकर जागेमध्ये हे बांबू उद्यान उभारण्यात येणार आहे. दैनंदिन जीवनातील वापराच्या दृष्टीने बांबू हे बहुउपयोगी आहे. याची माहिती आणि ज्ञान पुढील पिढीला व्हावी हा यामागील उद्देश आहे. जगभरात बांबूच्या सुमारे सतराशे प्रजाती आहेत. परंतू, आपल्याकडील वातावरणात साधारण १०८ प्रजातींची लागवड होवू शकते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात साधारण २२ प्रजातींची रोपे खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यानंतर या उद्यानामध्ये पॅगोडा, सिमाभिंतही बांबूचीच असेल. तसेच बांबूच्या विविध प्रजाती आणि उपयोगाची माहितीही देण्याची व्यवस्था याठिकाणी करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचा खर्च असून या कामासाठी दोन ते अडीच वर्षे लागतील.
   सध्या क्रिकेट स्टेडीयम व परिसरातील झाडे जगविण्यासाठी सहकारनगर येथून वाहणा-या आंबिल ओढ्यातील ग्रे वॉटर वापरण्यात येते. बांबू उद्यान विकसित करण्यासाठीही पाण्याची गरज भासणार आहे. सहकारनगर येथे कात्रज तलावातून निघालेला उच्छवास आहे. या उच्छवासाचे पाणी पंपिंग करून टेकडीवर पाण्याची टाकी बांधून तेथे घेण्यात येणार आहे. यासाठीही निविदा काढण्यात आली आहे. लवकरच या कामालाही सुरूवात होईल, असे घोरपडे यांनी नमूद केले. 

Web Title: Bamboo special garden at five acres on Taljai tekdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.