महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये अत्यावश्यक कामे वगळता नागरिकांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:12 AM2021-03-31T04:12:23+5:302021-03-31T04:12:23+5:30

पुणे : कोरोना रुग्णांची होणारी वाढ लक्षात घेता, पुणे महापालिकेने महापालिकेच्या मुख्य इमारतीसह, विविध परिमंडळ कार्यालये व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ...

Ban on citizens except for essential works in the main building of the corporation | महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये अत्यावश्यक कामे वगळता नागरिकांना बंदी

महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये अत्यावश्यक कामे वगळता नागरिकांना बंदी

Next

पुणे : कोरोना रुग्णांची होणारी वाढ लक्षात घेता, पुणे महापालिकेने महापालिकेच्या मुख्य इमारतीसह, विविध परिमंडळ कार्यालये व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अत्यावश्यक कामांव्यतिरिक्त नागरिकांना पूर्णत: बंदी घातली आहे. यातून नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना वगळण्यात आले आहे़

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे कार्यालयीन आदेश सर्वांना दिले आहेत. यामध्ये निमंत्रित केलेल्या व्यक्तींना संबंधित विभागाने व कार्यालय प्रमुखांनी प्रवेशपत्र दिले असेल, तरच त्यास इमारतीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. तसेच कोणतेही काम अडू नये याकरिता नागरिकांनी प्रत्यक्ष कार्यालयात न येता आपले म्हणणे, तक्रार, सूचना या लेखी स्वरूपात ई-मेलव्दारे संबंधित खात्यास पाठवाव्यात असेही सांगण्यात आले आहे़

विशेष म्हणजे, महापालिका इमारतीत विविध परिमंडळ, विविध क्षेत्रीय कार्यालये यांनी त्यांच्याकडील अत्यंत तातडीचे टपाल, संदेश हे देखील ई-मेलव्दारे पाठवावेत असे सांगण्यात आले आहे़

-----------------------

महापालिकेचे प्रवेशव्दार बंद

मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच महापालिकेचे मुख्य प्रवेशव्दार बंद करण्यात आले होते़ येथून केवळ महापालिका कर्मचारी यांना ओळखपत्र पाहूनच आत सोडण्यात येत होते़ तसेच नागरिकांना या आदेशाची कल्पना नसल्याने येथे सुरक्षा रक्षकांचा फौजफाटाच उभा होता़ महत्वाचे काम असेल तर संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना बाहेर बोलवा, अन्यथा परत जावा अशा सूचना यावेळी देण्यात येत होत्या़

----------------------

फोटो तन्मयने काढले आहेत़

----------------------------

Web Title: Ban on citizens except for essential works in the main building of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.