VIDEO - चित्रपटांवर बंदी, आंदोलने यातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी - अंधश्रद्धा निर्मुलन समिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 03:29 PM2017-11-20T15:29:47+5:302017-11-20T15:30:22+5:30
न्यूड, एस दुर्गा, दशक्रिया, पद्मावती आदी चित्रपटांच्या निमित्ताने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
पुणे - न्यूड, एस दुर्गा, दशक्रिया, पद्मावती आदी चित्रपटांच्या निमित्ताने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. चित्रपटांमधून सामाजिक परिस्थितीचे वास्तव चित्रण, रूढी-परंपरा आदी विषयांवर भाष्य करण्यात आले आहे. मात्र, या कलाकृतीबाबत आक्षेप घेतला जात आहे.
चित्रपटांवर बंदी, आंदोलने यातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे, असे मत महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र अंनिसतर्फे पत्रकार परिषदेत हे मत व्यक्त करण्यात आले.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला ५१ महिने उलटूनही पाचही तपास यंत्रणांना अद्याप यश आलेले नाही. सीबीआय तसेच इतर तपास यंत्रणांना सातत्याने अपयश येत आहे, अशी टीका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली.