उत्तमनगरमध्ये भाजीविक्रीवर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:11 AM2021-05-12T04:11:36+5:302021-05-12T04:11:36+5:30
त्यामुळे या काळात कोणतेही भाजीविक्रेते हे भाजीविक्री करण्याकरता रस्त्यावर हातगाडी अगर स्टॉल लावणार नाहीत. शिवणे-उत्तमनगर-कोंढवे धावडे-कोपरे हद्दीतील सर्व अत्यावश्यक ...
त्यामुळे या काळात कोणतेही भाजीविक्रेते हे भाजीविक्री करण्याकरता रस्त्यावर हातगाडी अगर स्टॉल लावणार नाहीत. शिवणे-उत्तमनगर-कोंढवे धावडे-कोपरे हद्दीतील सर्व अत्यावश्यक सेवेमध्ये मोडणारे व्यापारी व दुकानदार यांनी अत्यावश्यक सेवांमधील दूध डेअरी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू राहतील तसेच भाजी व फळविक्रेत्यांची दुकान बंद राहतील.
सोमवार दिनांक १७ मे रोजी भाजीविक्रेते यांचे जवळ कोविड टेस्ट केलेले सर्टिफिकेट असणे बंधनकारक असेल भाजीविक्रेते व किराणा माल दूध डेअरी विक्रेते यांचे जवळ कोविड सर्टिफिकेट नसल्यास त्यांना आपले दुकान सुरू करता येणार नाही.
वरील वेळेचे बंधन पाळून सर्व अत्यावश्यक सेवेत मोडणारी दुकानदार व व्यापारी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता स्थानिक प्रशासन व स्थानिक पदाधिकारी यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
काल उत्तमनगरमध्ये खूप गर्दी झाली होती आणि त्याची दखल ‘लोकमत’ वृत्तपत्राने घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर आज हा निर्णय घेण्यात आला.