तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:09 AM2021-06-01T04:09:26+5:302021-06-01T04:09:26+5:30

डॉ. कल्याण गंगवाल : केंद्रीय मंत्र्यांना पत्र पुणे : तंबाखूच्या सेवनामुळे भारतात दररोज जवळपास १० हजार लोक मृत्यूला सामोरे ...

Ban tobacco products | तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालावी

तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालावी

Next

डॉ. कल्याण गंगवाल : केंद्रीय मंत्र्यांना पत्र

पुणे : तंबाखूच्या सेवनामुळे भारतात दररोज जवळपास १० हजार लोक मृत्यूला सामोरे जात आहेत. हृदयरोग, कर्करोग, एड्स यापेक्षाही तंबाखूचे व्यसन अधिक घातक आहे. त्यामुळे विषवल्ली तंबाखूला समाजातून हद्दपार करण्यासाठी तंबाखूचा समावेश अमली पदार्थांच्या यादीत करून त्यावर बंदी घालावी, अशी मागणी शाकाहार व व्यसनमुक्ती कार्यकर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली.

३१ मे हा दिवस जगभर जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने डॉ. कल्याण गंगवाल यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. सर्वजीव मंगल प्रतिष्ठानच्या माध्यमातून डॉ. कल्याण गंगवाल गेली ३१ वर्षे तंबाखूमुक्त भारत आंदोलन राबवत आहेत.

डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, "तंबाखू शेतीवर बंदी घालण्याची मागणी केंद्रीय कृषिमंत्री यांच्याकडे केली आहे. तरुण पिढीला तंबाखूमुक्त व व्यसनमुक्त करण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालणे गरजेचे आहे. तंबाखू सेवन करणाऱ्यांना आवाहन करतो की, सिगारेट, बिडी, जर्दा, मावा, गुटखा, मशेरी, तपकीर याचा वापर करू नये. तंबाखू विक्रेत्यांनी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये."

Web Title: Ban tobacco products

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.