जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर बंदी?, अजित पवारांच्या बैठकीनंतर आदेश निघणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:09 AM2021-06-18T04:09:14+5:302021-06-18T04:09:14+5:30

पुणे: पुणे शहरातली रुग्णसंख्या आटोक्यात आली असली, तरी ग्रामीण भागात मात्र अजून कोरोना रुग्ण सापडत आहेत. हे लक्षात घेता ...

Ban on tourist places in the district ?, the order will be issued after Ajit Pawar's meeting | जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर बंदी?, अजित पवारांच्या बैठकीनंतर आदेश निघणार

जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर बंदी?, अजित पवारांच्या बैठकीनंतर आदेश निघणार

Next

पुणे: पुणे शहरातली रुग्णसंख्या आटोक्यात आली असली, तरी ग्रामीण भागात मात्र अजून कोरोना रुग्ण सापडत आहेत. हे लक्षात घेता जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जायला आता जिल्ह्याबाहेरील नागरिकांना बंदी असणार आहे. पोलीस अधीक्षक डॅा. अभिनव देशमुख यांनी आढावा घेऊन बंदी घालणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. आता यासंदर्भात,

शनिवार (दि.१९) रोजी होणाऱ्या बैठकीत चर्चा करून जिल्हाधिकारी लेखी आदेश काढणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात नयनरम्य अशी पर्यटने स्थळे आहेत. पावसाळ्यात गड-किल्ल्यांसह या पर्यटन स्थळांवर पर्यटक गर्दी करत असतात. पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलीस आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने काही बंधने घालण्यात आली आहेत. त्यामध्ये सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुणे जिल्ह्याबाहेरील नागरिकांना पुण्यातील पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले आहे.

पुण्यातील पर्यटन स्थळांची यादी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवली आहे. पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश काढण्यात येणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पोलीस सुरक्षा आणि बॅरिकेड लावण्यात येणार आहेत. पुणे-खोपोली आणि पुणे -तळेगाव हायवेच्या टोलनाक्यावर फ्लेक्स लावण्यात येणार आहेत. त्याठिकाणी पर्यटन स्थळांवर गर्दी टाळण्याच्या हेतूने बंदी घालण्यात आली आहे, अशा सूचना लावण्यात येणार आहेत, असे प्रसाद म्हणाले.

----

स्थानिकांना परवानगी

जिल्ह्यातील अनेक भागात बाहेरून नागरिक पर्यटनाला येत असतात. पण कोविडच्या पार्श्वभूमीवर बाहेरील नागरिकांना परवानगी नसणार आहे. त्यानुसार चेक पोस्टवर पोलीस बंदोबस्त असणार आहे. ग्रामीण भागात स्थानिक नागरिकांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्या भागात आरोग्य सुविधाही अत्यल्प आहेत. त्यांचा कोरोनापासून बचाव होणे गरजेचे आहे. बाहेरील नागरिक त्यांच्या संपर्कात येऊन कोरोनाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: Ban on tourist places in the district ?, the order will be issued after Ajit Pawar's meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.