अष्टविनायक मोरगावच्या यात्रेत यंदा जलाभिषेक आणि पूजेला बंदी, दर्शन मात्र सुरू राहणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 10:08 AM2021-02-11T10:08:40+5:302021-02-11T10:17:07+5:30

Ganesh Jayanti News :  यात्रेदरम्यान  सर्व धर्मीयांना  मुक्तद्वार दर्शनाच्या निमित्ताने  मुख्य मुर्ती गाभाऱ्यात जाऊन श्रींस जलस्नान घालण्याची परवानगी  असते . मात्र  कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे  ही परवानगी प्रशासनाने  नाकारली आहे . 

Ban on water anointing and pooja in Ashtavinayak Morgaon Yatra this year, however Darshan will continue | अष्टविनायक मोरगावच्या यात्रेत यंदा जलाभिषेक आणि पूजेला बंदी, दर्शन मात्र सुरू राहणार 

अष्टविनायक मोरगावच्या यात्रेत यंदा जलाभिषेक आणि पूजेला बंदी, दर्शन मात्र सुरू राहणार 

googlenewsNext

बारामती - अष्टविनायक तीर्थक्षेत्र  मोरगाव ता. बारामती येथील माघी  यात्रा उत्सवाच्या निमित्ताने माघ शुद्ध प्रतिपदा शुक्रवार  दि . १२ ते  माघ शुद्ध पंचमी  मंगळवार  दि .१६  पर्यंत विविध  धार्मिक कार्यक्रम होणार  आहेत .  यात्रेदरम्यान  सर्व धर्मीयांना  मुक्तद्वार दर्शनाच्या निमित्ताने  मुख्य मूर्ती गाभाऱ्यात जाऊन श्रींस जलस्नान घालण्याची परवानगी  असते . मात्र  कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे  ही परवानगी प्रशासनाने  नाकारली आहे .  उत्सवकाळात मंदिर सुरु राहणार असून   भाविकांना केवळ नित्य दर्शन  घेता येणार असल्याची  माहीती  चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांनी दिली .

दरवर्षी माघ शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध पंचमी या काळात  पहाटे पाच ते  दुपारी बारा वाजेपर्यंत  मुख्य मूर्ती गाभार्‍यापर्यंत जाऊन श्रींना जलस्नान व अभिषेक पूजा घालण्याची  पर्वणी साधता येते . वर्षातुन हा दोनदा योग असतो . त्यापैकी एक भाद्रपद यात्रा व दुसरी माघ यात्रा उत्सव होय.  काही दिवसावर येऊन ठेपलेल्या माघी यात्रा उत्सवास  परवानगी मिळणेबाबत चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने पत्रव्यवहार केला होता . त्याचबरोबर मोरगावचे सरपंच निलेश केदारी यांनी  भावीकांना   मुक्तद्वार दर्शनास परवानगी मिळणेबाबत प्रांताधीकारी व विविध शासकीय पातळीवर प्रयत्न केले होते . 

 यानुसार  वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी आज दि १०  रोजी  दिलेल्या पत्रानुसार  कोरोना  या विषाणूजन्य आजारामुळे फक्त मुख्य मूर्ती गाभाऱ्यात जाऊन जलस्नानास (  मुक्तद्वार दर्शनास )  परवानगी नाकारली आहे . मात्र  नेहमीप्रमाणे  मंदिर सुरु ठेवण्यास परवानगी मिळाली आहे  . सर्व भावीकांसाठी  मुख्य मुर्ती गाभाऱ्याच्या बाहेरुन   नित्य दर्शनास  , तसेच परंपरेने चालत आलेल्या   धार्मिक कार्यक्रमास  परवानगी दिलेली आहे. 

दरम्यान श्रीमान महासाधू मोरया गोसावी प्राप्त मंगलमूर्ती पालखी सोहळा मागील  भाद्रपद यात्रेप्रमाणे याही यात्रेस  गाडीतून येणार आहे . हा पालखी सोहळा रविवार दि . १४ रोजी  रात्री ८ वाजता येणार आहे . यावेळी मंगलमूर्ती व मयुरेश्वर भेट सोहळा संपन्न  होतो  . यात्रे दरम्यान श्रींना  सुवर्णालंकारयुक्त पोशाख चढविण्यात येतो .यात्रा काळात  मुख्य विश्वस्त  मंदार देव यांच्या हस्ते महापूजा व ईतर धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तर मंगलमूर्ती पालखीचे मोरगाव येथून  प्रस्थान बुधवार  दि  १७ रोजी  दुपारनंतर होणार आहे .

Web Title: Ban on water anointing and pooja in Ashtavinayak Morgaon Yatra this year, however Darshan will continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.