माथाडी संघटनेच्या बंदाचा पुण्यात फारसा परिणाम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:29 AM2020-12-15T04:29:18+5:302020-12-15T04:29:18+5:30

पुणे : महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने पुण्यात विविध मागण्यासाठी सोमवार (दि.१४) रोजी मुंबई आणि ...

The bandh of the Mathadi organization has not had much effect in Pune | माथाडी संघटनेच्या बंदाचा पुण्यात फारसा परिणाम नाही

माथाडी संघटनेच्या बंदाचा पुण्यात फारसा परिणाम नाही

Next

पुणे : महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने पुण्यात विविध मागण्यासाठी सोमवार (दि.१४) रोजी मुंबई आणि पुण्यात एक दिवसाचा बंद पुकरला होता. पुण्यातील मार्केट यार्डात केवळ कांदा व बटाटा विभागातच माथाडी संघटनेचे काम अधिक आहे. यामुळेच सोमवारी पुण्यातील तरकारी विभाग, फळे विभागात काही परिणाम झाला नाही. तर कांदा-बटाटा विभागात २०-२५ टक्के परिणाम झाला.

माथाडी संघटनेने बाजार समितीमधील परवानेधारक माथाडी/मापारी कामगारांच्या मजूरीवरील लेव्हीची रक्कम आडत्यांनी खरेदीदारांकडून वसूल करून माथाडी मंडळात जमा करावी, असे आदेश दिलेले आहेत. हक आदेशाची अंमलबजावणी सर्वत्र होत आहे. परंतु, नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा या निर्णयास विरोध आहे, या कारणास्तव गेले अनेक वर्षापासून लेव्ही वसुलीचा प्रश्न प्रलंबित

राहिल्याने सन २००८ पासून करोडो रूपयांची लेव्हीची रक्कम व्यापाऱ्यांनी स्वतःकडे जमा ठेवलेली आहे. त्यामुळे या लेव्हीच्या माध्यमातून कामगारांना फंड, ग्रॅज्युईटी बोनस इत्यादी फायदे मिळत नाहीत. कामगारांच्या मजूरीवरील लेव्हीची रक्कम बोर्डात भरणा होण्यासाठी कार्यवाही व्हावी, आदी मागण्यासाठी हे आंदोलन केले होते.

Web Title: The bandh of the Mathadi organization has not had much effect in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.