‘रयत’चे उपाध्यक्ष बेंडे-पाटील यांचे निधन

By admin | Published: June 10, 2015 04:47 AM2015-06-10T04:47:30+5:302015-06-10T04:47:30+5:30

शिक्षणतज्ज्ञ रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, माजी शिक्षक आमदार शिवाजीराव बेंडे-पाटील (वय ८७) यांचे आज पहाटे हृदयविकाराने निवासस्थानी निधन झाले.

Bandyopadhyay's Vice President, Rayat's death | ‘रयत’चे उपाध्यक्ष बेंडे-पाटील यांचे निधन

‘रयत’चे उपाध्यक्ष बेंडे-पाटील यांचे निधन

Next

मंचर : शिक्षणतज्ज्ञ रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, माजी शिक्षक आमदार शिवाजीराव बेंडे-पाटील (वय ८७) यांचे आज पहाटे हृदयविकाराने निवासस्थानी निधन झाले. सायंकाळी त्यांच्यावर तपनेश्वर स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात बंधू प्रतापराव, विघ्नहर कारखाना संचालक विजयराव पाटील, पत्नी लीलाबाई, मुलगा उदय असा परिवार आहे. शिवाजीराव बेंडे पाटील १९८४ मध्ये शिक्षक लोकशाही आघाडी करून विधान परिषदेवर शिक्षक आमदार म्हणून निवडून गेले होते. २०११ मध्ये त्यांची रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. ९ मे २०१४ मध्ये त्यांची पुन्हा निवड करण्यात आली. शिक्षक लोकशाही आघाडीच्या माध्यमातून त्यांनी शिक्षकांसाठी काम केले. त्यासाठी राज्यभर त्यांचे दौरे सुरू असायचे.
सोमवारी त्यांनी नेहमीप्रमाणे कामे केली. आज पहाटे हृदयविकाराने त्यांचे झोपेतच निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी अंत्यदर्शनासाठी शिवनेरी निवासस्थानाकडे धाव घेतली. सायंकाळी निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. मंचर शहरातील तपनेश्वर स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी आमदार शिवाजीराव बेंडे पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नाना बोरले, गजेंद्र ऐनापुरे, सुधीर तांबे, राम कांडगे, हनुमंत भोसले, अनिल पाटील, उत्तम आवारी, रावसाहेब आवारी, देवदत्त निकम, बाळासाहेब बेंडे, सत्यशील शेरकर, दिलीप तुपे, कल्पना आढळराव पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Bandyopadhyay's Vice President, Rayat's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.