केंद्रीय अधिकाऱ्यांच्या दौऱ्यापूर्वी बाणेर चकाचक
By admin | Published: May 26, 2017 06:23 AM2017-05-26T06:23:23+5:302017-05-26T06:23:23+5:30
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत औंध-बाणेर परिसराचा विकास करण्यात येत आहे. या विकासकामांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय नगरविकास
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत औंध-बाणेर परिसराचा विकास करण्यात येत आहे. या विकासकामांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय नगरविकास विभागाचे अतिरिक्त सचिव दुर्गा शंकर मिश्रा शुक्रवार (दि. २६) रोजी पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर औंध-बाणेर परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही धडक कारवाई केल्याची चर्चा गुरुवारी महापालिकेत रंगली.
बाणेर रस्त्याच्या दुतर्फा असलेली दुकाने आणि हॉटेलच्या फ्रंट मार्जिनमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत शेड्स आणि बांधकाम करण्यात आली होती. त्यामुळे येथे येणारी वाहने रस्त्यावरच उभी केली जात होती. रस्त्याची वहन
क्षमता कमी होउन वाहतुकीला अडथळा आणि सातत्याने अपघात होत आहेत.
दोनच महिन्यांपूर्वी याच परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या महिलेसह तिच्या मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याने हा रस्ता अधिकच चर्चेत आला होता. स्थानिक नगरसेवकांनी या परिसरातील रस्त्यावरील दुभाजक आणि गतिरोधकांबाबतही प्रशासनाकडे तक्रार केली होती.