माथेरानला ‘बंगला घोटाळा’; दस्तनोंदणीशिवाय ‘प्रॉपर्टी ट्रान्स्फर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:21 AM2021-09-02T04:21:01+5:302021-09-02T04:21:01+5:30

ब्रिटिशकालीन बंगले, जागांचे व्यवहार : नोंदणी महानिरीक्षकांचे रायगड जिल्हाधिकाऱ्यांना पत्र सुषमा नेहरकर-शिंदे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : माथेरान येथे ...

‘Bangla scam’ to Matheran; Property transfer without registration | माथेरानला ‘बंगला घोटाळा’; दस्तनोंदणीशिवाय ‘प्रॉपर्टी ट्रान्स्फर’

माथेरानला ‘बंगला घोटाळा’; दस्तनोंदणीशिवाय ‘प्रॉपर्टी ट्रान्स्फर’

googlenewsNext

ब्रिटिशकालीन बंगले, जागांचे व्यवहार : नोंदणी महानिरीक्षकांचे रायगड जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

सुषमा नेहरकर-शिंदे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : माथेरान येथे अनेक ब्रिटिशकालीन बंगले व जागांचे खरेदी विक्रीचे व्यवहार कोणत्याही प्रकारची दस्त नोंदणी न करताच केवळ जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन ‘प्राॅपर्टी ट्रान्सफर’ करण्यात आली आहे. यामुळे शासनाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला असून या व्यवहारांमध्ये जागांच्या किंमती, खरेदीदार, प्रत्यक्ष रकमेची देवघेव यात मोठा घोटाळा झाल्याचे प्रथमदर्शनी आढळले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने रायगड जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

रायगड जिल्ह्यातील माथेरान हे थंड हवेचे, प्रदूषणमुक्त असून ब्रिटिशकाळात विकसित झालेले प्रसिद्ध स्थळ आहे. येथे नेहमीच पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. येथील ब्रिटिशकालीन बंगले पर्यटकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचा मुद्दा ठरतो. महाबळेश्वरनंतर थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरानकडे लोकांचा ओढा असतो. माथेरानमध्ये तीस वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळे आहेत. आरोग्यदायक व उत्साहवर्धक हवामान, अतुलनीय निसर्ग व जोडीला थंड हवा यामुळे माथेरानला पर्यटकांची गर्दी असते.

येथील बहुतेक सर्व मोठी व प्रसिद्ध हाॅटेलं ही या ब्रिटिशकालीन प्रशस्त बंगल्यांमध्येच आहेत. सन १८५४ मध्ये मुंबईच्या गव्हर्नरने माथेरान येथे पहिला बंगला बांधला. त्यानंतर अनेक धनिकांनी येथे वास्तू उभारल्या. या सर्व ब्रिटिशकालीन बंगले व जागांची खरेदी-विक्री करण्यासाठी प्रथम जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. याच अधिकाराचा गैरवापर करत माथेरान येथे गेल्या काही वर्षात बंगले व जागांच्या खरेदी विक्री व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

चौकट

कर्जत तालुक्यातील माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेच्या हद्दीत अथवा त्याच्या आसपासच्या परिसरात रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासकीय भूखंडांचे वाटप दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याद्वारे खासगी व्यक्तींना करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने निष्पादित करण्यात आलेल्या भाडेपट्ट्याच्या दस्तावर, वाटपपत्र आदेशावर मुद्रांक शुल्क अदा करणे आवश्यक आहे. तथापी, या दस्तांना, वाटपपत्रांना मुद्रांक शुल्क अदा केले नसल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी, रायगड यांचे अहवालावरून दिसून येत आहे.

चौकट

असे झाले आहेत घोटाळे

उदाहरणादाखल हे प्रकरण पाहा -

भूखंड क्र. १३७ ए, सि.स.नं. २५३, क्षेत्र २१६३.२ चौ.मी. व भूखंड क्र. १३७ सि.स.नं. २६९ क्षेत्र २१६३ चौ.मी. क्र. २३९ सि.स.नं. १२३ क्षेत्र ११८४.२. चौ.मी. या भूखंडाच्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण पुढील तीस वर्षांकरीता आर्चडायसी बॉम्बे यांचे लाभात करून देण्यात आलेले आहे. मात्र यास मुद्रांक शुल्क अदा केले नसल्याचे दिसून येत आहे.

चौकट

चौकशीसाठी समिती

माथेरान व लगतच्या परिसरात अनेक प्रकरणांमध्ये अशा प्रकारे दस्त नोंदणी न करता मालमत्ता हस्तांतरण करण्यात आली आहे. या सर्व प्रकारच्या चौकशीसाठी मुद्रांक जिल्हाधिकारी, रायगड अलिबाग, चिटणीस, महसूल शाखा, रायगड अलिबाग, सहायक संचालक नगररचना, कोकण विभाग, ठाणे जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख रायगड, अलिबाग या अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: ‘Bangla scam’ to Matheran; Property transfer without registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.